पियाजो कंपनीच्या इलेक्ट्रीक रिक्षाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः घेतली राईड
बदलत्या काळानुसार आता पियाजिओ व्हेईकल्स कंपनीने इलेक्ट्रीक वाहननिर्मिती संशोधन व उत्पादनांवर भर द्यावा,

पियाजो कंपनीच्या इलेक्ट्रीक रिक्षाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः घेतली राईड
बदलत्या काळानुसार आता पियाजिओ व्हेईकल्स कंपनीने इलेक्ट्रीक वाहननिर्मिती संशोधन व उत्पादनांवर भर द्यावा.
बारामती वार्तापत्र
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामती दौैरा होता. यावेळी त्यांनी पियाजो कंपनीला भेटी दिली. दरम्यान इलेक्ट्रीक रिक्षाबाबत कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माहिती घेतली. इलेक्ट्रीक रिक्षा नेमकी कशी चालते याचे कुतहूल उपमुख्यमंत्र्यांना देखील पडले.
पियाजो कंपनीला भेट दिल्यानंतर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी अजितदादांना आपल्या नव्या उत्पादनाबाबत माहिती दिली. नव्या इलेक्ट्रिक रिक्षाबाबत माहिती जाणून घेतल्यानंतर अजितदादांना रिक्षा चालवण्याचा मोह आवरला नाही आणि त्यांनी थेट रिक्षाचं हँडल हातात घेतलं. अजितदादांनी ही रिक्षा कंपनीच्या आवारातच चालवली. अजितदादांना रिक्षा चालवताना पाहून कंपनीचे कर्मचारीही अवाक झाले होते. यावेळी अजितदादांनी या इलेक्ट्रिक रिक्षाबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली आणि कंपनीच्या या उत्पादनाचं कौतुकही केलं.
यावेळी अजित पवार यांनी स्वत: रिक्षा चालवली. पियोजिओ कंपनीने विकसित केलेली इलेक्ट्रीक रिक्षा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वत: चालवून पाहिली. त्यांच्या सोबत पाठीमागे कंपनीचे अध्यक्ष दियागो ग्राफी बसले होते. पवार यांनी कंपनीच्या आवारात
एक चककर मारत गाडीची तपासणी केली
यावेळी बोलतना अजित पवार म्हणाले की, भविष्यात पेट्रोल डिझेलच्या वाहनांच्या वापरावर मर्यादा येणार आहेत, प्रदूषण टाळण्यासह स्वस्त पर्याय म्हणून इलेक्ट्रीक वाहनांचा वापर टप्याटप्याने वाढविण्यात येणार आहे. एसटी देखील या पुढे इलेक्ट्रीकवरच्याच खरेदी करण्याचा निर्णय झाला आहे, या पार्श्वभूमीवर पियाजिओ कंपनीनेही आता इलेक्ट्रीक व सीएनजी गॅसच्या वापराच्या वाहनांच्या संशोधन
व उत्पादनावर भर द्यायला हवा. राज्य सरकारही या पुढील काळात प्रदूषणमुक्त राज्य करण्यासाठी इलेक्ट्रीक वाहनांना प्रोत्साहन देणार आहे.
त्यामुळे त्यांनी या रिक्षाच्या इलेक्ट्रीक बॅटरीचे, मायलेजची चौैकशी केली. व स्वत: कंपनीच्या आवारात रिक्षा चालवून पाहिली. या या रिक्षा राईडची चर्चा रंगली. सध्या सर्वत्र व्हीडीओ व्हायरल झाला आहे.पर्यावरण संरक्षणासाठी इलेक्ट्रीक वाहने सोयीस्कर आहेत, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी कंपनीचे कौैतुक केले.