पीपीई किट व इतर वैद्यकीय कचऱ्याचा राष्ट्रीय महामार्गालगत मोठा ढीग .
वापरलेल्या वस्तूंची विल्हेवाट न लावता फेकून दिल्या रस्त्यालगत.
पीपीई किट व इतर वैद्यकीय कचऱ्याचा राष्ट्रीय महामार्गालगत मोठा ढीग .
वापरलेल्या वस्तूंची विल्हेवाट न लावता फेकून दिल्या रस्त्यालगत.
इंदापूर:-प्रतिनिधी
पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत सरकारी मळ्यानजीक वापरात आलेले पीपीई किट व इतर वस्तुंची विल्हेवाट न लावता फेकून दिल्या असल्याने मोठा ढीग पडला आहे. त्यामुळे इथून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. एकंदरीतच कोरोनामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असताना अशा प्रकारे वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट न लावता फेकून दिल्याने इथून ये जा करणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
या ठिकाणा वरून अनेक लोक सकाळी व सायंकाळी पायी चालण्याकरिता येत असतात तसेच महामार्गावरून चारचाकी,दुचाकी व अवजड वाहनांची वर्दळ सातत्याने सुरू असते.
हा वैद्यकीय कचरा कोणी येथे टाकला हे अद्यापपर्यंत समजू शकले नसून या प्रकारामुळे लोकांमध्ये प्रचंड चीड निर्माण झाली आहे. अशा प्रकारे कचरा टाकणार्याची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.