पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात कडक निर्बंध जारी ; आठवडे बाजार राहणार बंद
दिवसा जमावबंदी तर रात्री संचारबंदी लागू

पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात कडक निर्बंध जारी ; आठवडे बाजार राहणार बंद
दिवसा जमावबंदी तर रात्री संचारबंदी लागू
बारामती वार्तापत्र
पुणे शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला असून रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने पुणे शहरात करण्यात आलेल्या निर्बंधा बरोबरच जिल्ह्यातील ग्रामीण भागात देखील दिवसा जमावबंदी तर रात्री संचारबंदी लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख दिले आहेत.त्यानुसार सदरील आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीस १ हजार रुपये दंडात्मक कारवाई करण्यात येणार असून आज दि.३ पासून दि.९ एप्रिल पर्यंत आदेश लागू करण्यात आले आहेत.
यानुसार पुणे जिल्ह्यातील सर्व गावातील आठवडी बाजार रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.पुणे जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती नगरपालिका नगरपरिषद हद्दीतील सर्व हॉटेल, रेस्टॉरंट, बार, मॉल, सिनेमा हॉल, नाट्यगृह, व्यायाम शाळा सात दिवस किंवा पुढील आदेशापर्यंत बंद राहणार आहेत. मात्र हॉटेलमधून पार्सल सेवा रात्री 11 वाजेपर्यंत पुरवण्यास परवानगी असेल. संपूर्ण जिल्हात सामाजिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच सभा-संमेलने, उद्घाटन, भूमिपूजन अशा, ज्या ठिकाणी अधिक लोक एकत्र येऊ शकतात ते सर्व कार्यक्रम बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.पुणे जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा, शैक्षणिक संस्था, महाविद्यालय 30 एप्रिलपर्यंत बंद राहतील, मात्र ऑनलाईन शिक्षण सुरू राहणार आहे. नागरिकांनी सार्वजनिक तसेच कामाच्या ठिकाणी अथवा खाजगी वाहनातून प्रवास करताना मास्क वापरणे बंधनकारक असणार आहे.तसेच