पुणे जिल्ह्यातील पाच ग्रामपंचायतींची निवडणूक लांबणीवर पडणार ??
बघा कोणत्या ग्रामपंचायतींचा सहभाग आहे.
पुणे जिल्ह्यातील पाच ग्रामपंचायतींची निवडणूक लांबणीवर पडणार??
बघा कोणत्या ग्रामपंचायतींचा सहभाग आहे.
बारामती वार्तापत्र
राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजले असताना व अनेक गोष्टींची अफवा उठत असताना तसेच ऐनवेळी वेगळा निर्णय येत असल्यामुळे ग्रामपंचायत निवडणूक ही बाब आता चर्चेची झाली आहे.
त्यातच महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने निवडणूक आयोगाला पत्र पाठवून राज्यातील 13 ग्रामपंचायतींची निवडणूक तीन महिने पुढे ढकलण्याची विनंती केली.
यातील काही ग्रामपंचायती नगरपंचायत होण्याच्या मार्गावर आहेत तसा प्रस्तावही नगर विकास विभागाकडे दाखल आहे. यामध्ये म्हटले आहे की या ग्रामपंचायती ची निवडणूक जर चालू प्रक्रियेमध्ये झाली तर काही दिवसानंतर नगरविकास विभागाकडे प्रस्ताव पात्र झाल्यास या ग्रामपंचायतींची बॉडी बरखास्त करावी लागेल.व पुन्हा नव्याने नगरपंचायतीच्या निवडणुकीस सामोरे जावे लागेल. त्यामुळे दुहेरी खर्च शासनास करावा लागेल त्यामुळे ही निवडणूक प्रक्रिया तीन महिन्यांसाठी थांबवावी अशी विनंती करण्यात आली आहे. त्याचबरोबर पुणे महानगरपालिकेची हद्दवाढ मध्ये जिल्ह्यातील औताडेहांडेवाडी, शेवाळेवाडी, वडाचीवाडी या तीन ग्रामपंचायतीचा समावेश आहे तर नगरपरिषदेत रूपांतर होणाऱ्या घुंग्गुस,ओझर,अकलूज नगरपंचायतीचे रूपांतरची प्रक्रिया तीन महिन्याकरता पुढे ढकलावी. असेही यामध्ये म्हटले आहे.
राज्यातील या जिल्ह्यातील निवडणुका लांबणीवर पडणार
पुणे 5,अमरावती 2 ,सोलापूर 4, जालना 1, जळगाव 1, चंद्रपूर 1 व नाशिक 1 तर घुग्गुस ,ओझर ,अकलूज त्यांचे नगरपरिषदेत रूपांतर होण्याचा प्रस्ताव आहे.