पुणे पदवीधर मतदारसंघातून संग्राम देशमुख यांनी विजयी होण्याचा विश्वास केला व्यक्त…
पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ आज बारामती येथे पदवीधर व कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन
पुणे पदवीधर मतदारसंघातून संग्राम देशमुख यांनी विजयी होण्याचा विश्वास केला व्यक्त…
पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ आज बारामती येथे पदवीधर व कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन.
बारामती वार्तापत्र
बारामतीकरांनी लोकसभा विधानसभा निवडणुकीवेळी भाजपच्या उमेदवारांना जसे भरघोस मतदान केले.तसेच पदवीधर मतदार संघाच्या निवडणूक वेळीही पदवीधर मतदारांनी मला पहिल्या पसंतीचे मतदान करून विजयी करा असे आवाहन भाजपाचे पदवीधर मतदार संघाचे अधिकृत उमेदवार संग्राम देशमुख यांनी केले.पुणे पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ आज बारामती येथे पदवीधर व कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी देशमुख बोलत होते.
पुणे मतदारसंघात सर्वच ठिकाणी भाजपाचे केडर बेस कार्यकर्ते पदाधिकारी आहेत. अगदी दहा मिनिटात मतदार संघातील प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्याची कुवत भारतीय जनता पक्षाकडे आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या प्रचारासाठी प्रचाराचा कालावधी कमी असला तरीसुद्धा आम्ही प्रत्येक मतदारापर्यंत जास्तीत जास्त वेळा पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत.असे देशमुख म्हणाले.