पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बारामती येथे १२ वर्षीय मुलीच्या पोटातील १५x१४x१० सेमी आकाराच्या मोठ्या गाठीची यशस्वी शस्त्रक्रिया
कौशल्यपूर्ण कार्यामुळे ही शस्त्रक्रिया यशस्वी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बारामती येथे १२ वर्षीय मुलीच्या पोटातील १५x१४x१० सेमी आकाराच्या मोठ्या गाठीची यशस्वी शस्त्रक्रिया
कौशल्यपूर्ण कार्यामुळे ही शस्त्रक्रिया यशस्वी
बारामती वार्तापत्र
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात १२ वर्षीय मुलीच्या पोटातील मोठ्या गाठीवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. ही मुलगी गेल्या आठवड्यापासून तीव्र पोटदुखीने त्रस्त होती. रुग्णालयात दाखल केल्यानंतर तातडीने सोनोग्राफी व सीटी स्कॅन करण्यात आले. तपासणीत १५x१४x१० सेमी आकाराची मोठी गाठ असल्याचे निदान झाले.
शस्त्रक्रियेतील डॉक्टरांची भूमीका:
रुग्णाच्या गंभीर स्थितीचे गांभीर्य ओळखून, महाविद्यालयातील अनुभवी आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने तत्काळ शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला.
स्त्रीरोगतज्ञ डॉ. तुषार गदादे आणि निवासी डॉ. वृषाली दडस यांनी शस्त्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावत गाठ सुरक्षितरीत्या काढून टाकली. गाठ मोठ्या आकाराची असूनही, तिला कोणतीही गुंतागुंत न होता काढण्यात त्यांना यश मिळाले. त्यांच्या कौशल्यपूर्ण कार्यामुळे ही शस्त्रक्रिया यशस्वी ठरली.
बधिरिकरण विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. प्रज्ञा भालेराव यांनी रुग्णाला योग्य बधिरिकरण करून शस्त्रक्रियेची प्रक्रिया सुरळीत पार पडावी याची दक्षता घेतली.
डॉ. सूरज जाधवर,डॉ राजेश उमप,डॉ. विनोद कुटे, डॉ. रेणुका बुनगे आणि निवासी डॉक्टर डॉ. अनघा लोंढे यांनी संपूर्ण प्रक्रियेत सहकार्य करत शस्त्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर आपली जबाबदारी नेटाने पार पाडली.
शस्त्रक्रियेनंतर रुग्णावर योग्य ती निगा ठेवण्यात आली. गाठीमुळे होणाऱ्या त्रासातून पूर्णपणे आराम मिळाल्यानंतर तिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
डॉक्टरांच्या तज्ज्ञतेमुळे आणि समर्पित प्रयत्नांमुळे ही जटिल शस्त्रक्रिया अत्यंत यशस्वी झाली. त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक करून, अधिष्ठाता डॉक्टर चंद्रकांत मस्के या मुळे महाविद्यालयाच्या वैद्यकीय सेवेचा स्तर उंचावला आहे असे मत व्यक्त केले.