पुणे

पुण्यातील शिवसेना कार्यकर्ते आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यात धक्काबुक्की

सोमय्या जखमी झाले असून एक्सरे काढण्यासाठी आणि इतर तपासण्या करण्यासाठी ते पुण्यातील संचेती रुग्णालयात दाखल 

पुण्यातील शिवसेना कार्यकर्ते आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यात धक्काबुक्की

सोमय्या जखमी झाले असून एक्सरे काढण्यासाठी आणि इतर तपासण्या करण्यासाठी ते पुण्यातील संचेती रुग्णालयात दाखल

पुणे;प्रतिनिधी

शिवसेना आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने आले आहेत. शिवसैनिकांनी भाजपचे माजी खासदार आणि नेते किरीट सोमय्या यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप केला जात आहे. किरीट सोमय्या हे काही वेळापूर्वी पुणे महापालिकेत आले होते. यावेळेस त्यांना धक्काबुक्की करण्यात आल्याचं समजत आहे.

शिवसैनिकांनी किरीट सोमय्या यांना धक्काबुक्की केली आहे. किरीट सोमय्यांचा ताफा महापालिकेच्या आवारात येताच अचानकपणे शिवसैनिकांनी धक्काबुक्कीचा प्रयत्न केला. साधारण 80 ते 100 शिवसैनिक असल्याचं सांगितलं जात आहे. पुणे महानगरपालिकेमध्ये तुफान गोंधळ पाहायला मिळाला आहे. शिवसैनिकांनी किरीट सोमय्यांविरोधात घोषणाबाजी केली आहे.

कोरोना काळात पुण्यात जम्बो कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. परंतु, या कोविड सेंटरमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला. या भ्रष्टाचाराची तक्रार देण्यासाठी ते आज पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गेले होते. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार देऊन पुणे महानगरपालिकेत आयुक्तांनाही यावेळी सिरीट सोमय्या तक्रार देणार होते. परंतु, यावेळी सोमय्या पुणे महापालिकेच्या इमारतीत प्रवेश करताना इमारतीत आधीपासूनच उपस्थित असलेल्या शिवसेना कार्यकर्त्यांनी त्यांना घेरले आणि झटापट झाली. त्यानंतर सोमय्या यांच्यासोबत असलेल्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना बाहेर नेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी झालेल्या झटापटीत सोमय्या पालिकेच्या पायऱ्यांवर पडले. त्यामध्ये ते जखमी झाले.

दरम्यान, किरीट सोमय्या यांच्या विरोधात पुण्यातील शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी सोमय्या यांची गाडी अडवून गाडीवर हाताने ठोसे मारले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे पुणे महानगर पालिकेच्या इमारतीसमोर एकच गोंधळ उडाला.

पुण्यातील जम्बो कोविड सेंटर चालवण्याचे  कंत्राट लाईफ लाईन मॅनेजमेंट सर्व्हिसेस या कंपनीला देण्यात आलं होतं. कोविड सेंटर सुरू असताना त्यात अनेक रुग्णांचा मृत्यू झाला. त्यासाठी हॉस्पिटलचे व्यवस्थापण कारणीभूत आहे असून लाईफ लाईन मॅनेजमेंट सर्विसेसला या कामाचा अनुभव नसताना सेंटरचे कंत्राट देण्यात आले, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. या संदर्भात तक्रार देण्यासाठी किरीट सोमय्या आज पुण्यात गेले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram