पुन्हा एकदा शाळा सुरु शालेय शिक्षण विभागाचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे प्रस्ता; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती
राज्यात अचानक कोरोनाबाधित आणि ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या वाढल्यामुळे शाळा आणि महाविद्यालय बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

मुंबई -प्रतिनिधी
राज्यात अचानक कोरोनाबाधित आणि ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या वाढल्यामुळे शाळा आणि महाविद्यालय बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.मात्र, आता अनेक पालक संघटनांनी शाळा सुरू करण्याची मागणी लावून धरली आहे. सोमवारपासून शाळा सुरू करण्याबाबत प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्यात आलेला असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
गेल्या काही दिवसांपासून कोरोना व ओमायक्रोनच्या वाढत्या संसर्गामुळे धोका लक्षात घेता राज्य सरकारने राज्यातील शाळा 15 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या घटत असून त्याचा प्रभावही कमी झाला आहे. त्यामुळे आता शाळा सुरू करण्यात याव्यात, अशी मागणी विविध घटकांतून केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने सोमवार पासून शाळा सुरू कारण्याबाबत एक प्रस्ताव तयार केला आहे. या प्रस्तावात राज्यातील शाळा कोरोना नियमांचे पालन करुन सुरू कराव्यात. त्या संबंधी निर्णय घेण्याचा अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे हा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठविण्यात आलेला आहे. या प्रस्तावावर उद्याचा मंत्री मंडळाचा बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती मिळत आहे.