पुन्हा लॉक डाऊन ची ती बातमी खोटी,,अफवा पसरवणाऱ्या वर कारवाई करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
ग्रूपचे नाव ( स्क्रीन शॉट सह) पाठवल्यास योग्य ती कारवाई केली जाईल
पुन्हा लॉक डाऊन ची ती बातमी खोटी,,अफवा पसरवणाऱ्या वर कारवाई करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
ग्रूपचे नाव ( स्क्रीन शॉट सह) पाठवल्यास योग्य ती कारवाई केली जाईल
बारामती वार्तापत्र
पुण्यात आणि पिंपरी चिंचवड मध्ये सोमवारपासून पुन्हा पंधरा दिवस या TV9 च्या जुन्या बातमीचा व्हिडीओ पुन्हा एकदा कोणीतरी व्हायरल केलाय.
सध्या तरी पुण्यात आणि पिंपरी चिंचवड मध्ये प्रशासनाने असे कोणतेही आदेश दिलेले नाहीत, असे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.
सोशल मीडियावर आज व्हायरला झालेला व्हिडिओ जुना आहे. त्यात जिल्ह्यात लॉकडाउन होणार असल्याचे म्हटलेले आहे. पण, तो जुना व्हिडीओ असून लॉकडाऊन होणार ही अफवा आहे. अशा अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये. तसेच, अफवा पसरविणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्याचा आदेश पोलिस प्रशासनाला देण्यात आला आहे. मात्र, कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी नागरिकांनीही काळजी घेणे गरजेचे आहे, असे जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी म्हटले आहे.
काही दिवसांपासून पुणे शहर आणि जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनाचा हा संसर्ग वाढू नये, तो आटोक्यात राहावा, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून उपाय योजना करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मंगल कार्यालये, हॉल, लॉन्स, कोचिंग क्लासेस, शाळा-महाविद्यालये, नाट्यगृहे, चित्रपटगृहे, व्यायाम शाळा, शॉपिंग मॉल्स, धार्मिक स्थळे, उद्याने अशा सार्वजनिक ठिकाणी निर्बंध आणखी कठोर करण्यात आले आहेत.
मास्क न परिधान करणाऱ्या नागरिकांवर कठोर कारवाई सुरू करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी शुक्रवारी याबाबतचा आदेश दिला आहे.