
पूनावाला गार्डन येथे सीसी.टीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी
अमानवीय घटना घडू शकतात
बारामती वार्तापत्र
सार्वजनिक उद्यान गुल पूनावाला गार्डन बारामती या ठिकाणी सीसी.टीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे या करीता भाजपा पुणे जिल्हा ग्रामीण अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने मुख्याधिकारी यांना (दि:२१) रोजी निवेदन देण्यात आले.
गेल्या पंधरा दिवसापूर्वी मुंबई येथे एका महिलेवर अमानुष अत्याचार होऊन महिलेची हत्या करण्यात आली होती. ही पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना आहे. बारामती नगर परिषद सार्वजनिक उद्यान येते महिला मुली दररोज आरोग्य संवर्धनासाठी येत असतात मुंबईतील झालेल्या. अत्याचारामुळे महिला व मुली यांच्यामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झालेली आहे.
सार्वजनिक उद्यान गुल पुनावाला गार्डन या ठिकाणी अशा अमानवीय घटना घडू शकतात त्यामुळे दक्षता म्हणून तात्काळ या ठिकाणी सीसी.टीव्ही. कॅमेरे बसविण्यात यावे त्यासाठी निवेदन देण्यात आले आहे.
जर पंधरा दिवसात सीसी.टीव्ही कॅमेरे न बसविल्यास महिला किंवा मुलींच्या बाबतीत काही अनुचित प्रकार घडल्यास प्रशासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी असे देखील सदर निवेदनात म्हणले आहे. या प्रसंगी भाजपा पुणे जिल्हा ग्रामीण अनुसूचित जाती मोर्चाचे चिटणीस साजन अडसूळ, अक्षय गायकवाड, शैलेश खरात, सागर (जाॅन) भिसे,शरद भगत,संजय (नाना) दराडे उपस्थित होते.