पूर्व आफ्रिकेत असणाऱ्या युगांडा देशातून फलटण शहरात आलेले ते चौघे कोव्हीड पॉझिटिव्ह!
फलटण शहरात भितीचे वातावरण तयार झाले आहे .
पूर्व आफ्रिकेत असणाऱ्या युगांडा देशातून फलटण शहरात आलेले ते चौघे कोव्हीड पॉझिटिव्ह!
फलटण शहरात भितीचे वातावरण तयार झाले आहे .
फलटण;प्रतिनिधी
पूर्व आफ्रिकेत असणाऱ्या युगांडा देशातून फलटण शहरात आलेल्या चार जणांची कोरोना चाचणी कोरोनाबाधित असल्याचे समोर आले असून प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची माहिती दिली जात नसल्याने जिल्ह्यासह फलटण तालुक्यात प्रशासनाच्या अजब कारभाराबाबत उलट सुलट चर्चा सुरू आहेत.
याबाबत सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की,पूर्व आफ्रिकेत असणाऱ्या युगांडा देशातून चार जण फलटण शहरात आले होते. फलटणला आल्यानंतर प्रशासनाने मिळालेल्या माहितीनुसार प्रशासनाकडून गेली दोन दिवस शोध सुरू होता अशी माहिती मिळत आहे. आज त्यांचा शोध लागल्यावर नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या नागरी आरोग्य सुविधा केंद येथे या चार जणांची कोरोना चाचणी करण्यात आली या चाचणीत झाल्यानंतर ते कोरोनाबाधित असल्याचे समोर आले.
चार जणांची कोरोनाबाधित आल्यानंतर या सर्वांना उपजिल्हा रुग्णालय फलटण याठिकाणी स्वतंत्र कक्षात विलगिकरण केले आहे. स्थानिक पातळीवर कोणत्याही प्रशासकीय जबाबदार अधिकारी यांनी याबाबत अत्यंत गोपनीयता पाळली असून याबाबत माहिती देण्याचे टाळले असल्याने शहरात भितीचे वातावरण तयार झाले आहे .
दरम्यान , त्या चौघांना ओमीक्रॉन आहे की नाही , याची खात्री करण्यासाठी जनुकीय नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. नेहमीसारखे व जबाबदार प्रशासनाकडून जनतेस माहिती देण्याचे टाळले जात असल्याने प्रशासनाच्या एकंदरीत दुर्लक्षित कारभारावर संशय निर्माण केला जात आहे.