पेट्रोल- डिझेल दरवाढी विरोधात इंदापूर मध्ये शिवसेनेकडून केंद्र सरकारचा जाहीर निषेध
तहसीलदार सोनाली मेटकरी यांना दिले निवेदन
पेट्रोल- डिझेल दरवाढी विरोधात इंदापूर मध्ये शिवसेनेकडून केंद्र सरकारचा जाहीर निषेध
तहसीलदार सोनाली मेटकरी यांना दिले निवेदन
इंदापूर:सिद्धार्थ मखरे ( प्रतिनिधी )
केंद्र सरकारकडून वारंवार होत असलेल्या पेट्रोल डिझेल दरवाढी संदर्भात इंदापूर तालुका शिवसेनेच्या वतीने इंदापूर तहसील कचेरीसमोर आज (दि.५) रोजी केंद्र सरकारचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला.
कोरोना काळानंतर हळूहळू जनजीवन पुर्ववत होत असताना केंद्र सरकार वारंवार पेट्रोल व डिझेलची दर वाढ करत आहे.त्यामुळे सर्वसामान्यांची पिळवणुक होत असुन वाढती महागाई , बेरोजगारी व त्याच बरोबर सातत्याने होणारी इंधन दरवाढ यामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. त्यामुळे मी इंदापूर तालुका शिवसेना व पुणे जिल्हा शिवसेना यांच्या वतीने केंद्र सरकारचा जाहीर निषेध व्यक्त करतो असे शिवसेना जिल्हा प्रमुख अँड. राजेंद्र काळे म्हणाले. यावेळी इंदापूरच्या तहसीलदार सोनाली मेटकरी यांना या संदर्भातील निवेदन देण्यात आले.
यावेळी तालुका प्रमुख नितीन शिंदे, जिल्हा समन्वयक विशाल बोंद्रे, तालुका संघटक सुदर्शन रणवरे,उपतालुकाप्रमुख संदीप चौधरी, आप्पासाहेब डोंगरे, सुदर्शन साखरे,मारुती खोपकर, गणेश राऊत, अंकुश गलांडे,पांडुरंग वाघ, जंहागीर पठाण सह शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.