
पोदार जंबो किडस् मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न
सुंदर अभिनय करीत नृत्य,गीत सादर केले
बारामती वार्तापत्र
लहान मुलांचे सुंदर नृत्य,गाणी, अभिनय,वक्तृत्व आदी चे सादरीकरण करीत व उपस्तितांची टाळ्याची दाद आशा विविध माध्यमातून सुर्यनगरी येथील कै. लक्ष्मीबाई पवार एज्युकेशन फाऊंडेशनचेफिनिक्स इंग्लिश मेडियम स्कूल कनेक्ट पोदार जंबो किडस् ,भिगवन रोड ,बारामती येथील इंग्लिश मेडियम स्कुल चे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न झाले.
या प्रसंगी गट शिक्षण अधिकारी ,पंचायत समिती, पुरंदर चे संजय जाधव व संस्थेचे चेअरमन तुकाराम पवार , सचिव ,ओंकार पवार , संचालीका सौ.डॉ. स्नेहल पवार , प्रिन्सिपल मीनल कोर्टी , प्रिप्रायमरी च्या प्रमुख सौ. मोनिका झगडे , सुपरवायझर सौ. सारिका ऊगले आदी मान्यवर उपस्तीत होते.
या वर्षीच्या स्नेहसंमेलनाची कंन्सेप्ट ‘इमोशन नेशन ए वर्ल्ड ऑफ फिलिंगस विथ जंबो’ अशी होती त्या मुळे मुलांनी आनंद ,ऊत्साह , दुःख , भावना,समाज्यातील विविध प्रसंग अशा विविध गितावर साजेलसे मेकअप,ड्रेस कोड ,सुंदर अभिनय करीत नृत्य,गीत सादर केले.
शिक्षिका सौ. वंदना देवकाते ,सौ बोराटे ,निलोफर, ज्योती , रक्षंदा , वैष्णवी , सुप्रिया ,प्रतिक्षा यांनी सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
बाल वयात उत्तम व सुंदर संस्कार व्याहवे शिक्षण घेत असताना संस्कृती ची ओळख निर्माण व्याहवी या साठी शिक्षक वर्ग मेहनत घेत आहेत त्यासाठी पालक सुद्धा साथ देत आहेत व उत्कृष्ट शिक्षण देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे संस्थापक चेअरमन तुकाराम पवार यांनी सांगितले.