स्थानिक

पोलिसांची कारवाई व 3 किलो गांजा जप्त.

शहरातील आमराई परिसरात कारवाई.

पोलिसांची कारवाई व 3 किलो गांजा जप्त.

शहरातील आमराई परिसरात कारवाई.

बारामती :वार्तापत्र
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून बारामती शहरातील आमराई परिसरातील अनंतनगर येथे छापा टाकून १ लाख रुपये किमतीचा ३ किलो २२५ ग्रॅम गांजा जप्त केला आहे.पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांना सदर ठिकाणी गांजाची विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती.

त्यावरून सदर ठिकाणी छापा घातला असता पोलिसांची चाहूल लागताच आरोपी दीपक प्रकाश सकट व व सेवक प्रकाश सकट हे दोघे घराच्या अडीचा फायदा घेऊन बोळीतून पळून गेले. या ठिकाणी सुनिता प्रकाश सकट या मिळून आल्या. पोलिसांनी आरोपीच्या घराची झडती घेतली असता, कळशी व हंड्यामध्ये प्लास्टिकच्या पिशवीत सुमारे १ लाख रुपये किमतीचा ३ किलो २२५ ग्रॅम गांजा मिळून आला.

पोलिसांची कारवाई व 3 किलो गांजा जप्त,अशी माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी दिली त्याचा हा व्हिडिओ.????

सदर आरोपींवर एन.डी.पी.एस ॲक्ट नुसार बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची कामगिरी अपर पोलीस अधिक्षक मिलींद मोहीते, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती शहर पोलीस स्टेशन गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक पद्मराज गंपले, योगेश शेलार,सहा.फौजदार संदिपान माळी, पो.ना.ओंकार सिताप,पो.कॉ.राजेश गायकवाड,सिध्देश पाटील,पोपट कोकाटे,सुहास लाटणे,अंकुश दळवी,दशरथ इंगवले,अजित राऊत,योगेश कुलकर्णी,उमेश गायकवाइ, अकबर शेख म.पो.कॉ.कांबळे यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!