पोलिसांच्या भितीने नदीत उडी टाकल्याने एकाचा बुडून मृत्यू
पोलिसांवरही झाला हल्ला...बारामती तालुक्यातील सोनगाव येथील घटना..
पोलिसांच्या भितीने नदीत उडी टाकल्याने एकाचा बुडून मृत्यू
पोलिसांवरही झाला हल्ला…बारामती तालुक्यातील सोनगाव येथील घटना..
बारामती वार्तापत्र
बारामती तालुक्यातील सोनगाव येथे पोलिस पथक अवैध दारु विक्रेत्यावर कारवाई करण्यासाठी गेले असताना भितीपोटी त्याने निरा नदीत उडी मारली यात दम लागल्याने बुडून एकाचा मृत्यू झाला आहे. मंगलेश अशोक भोसले (वय ४५, ) असे मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे.. दरम्यान या घटनेनंतर संतप्त झालेल्या संबंधित वस्तीवरील जमावाने पोलिसांवर देखील हल्ला केला त्यात तीन पोलिस कर्मचारी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, सोनगाव येथील अवैध दारु धंद्यावर कारवाईसाठी बारामतीच्या उपविभागीय पोलिस अधिकाऱयांचे पथक गेले होते.. यावेळी पोलिसांची चाहूल लागताच मंगलेश भोसले याने भितीपोटी पळ काढला आणि घरा लगतच्या निरा नदीत उडी मारुन पळून जाण्याचा प्रयत्न केला परंतु पोहताना दम लागल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे संतप्त झालेल्या वस्तीवरील जमावाने पोलिसांवर हल्ला केला.. यात तीन पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत.. दरम्यान या घटनेमुळे सोनगाव गावांत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.. यामुळे याठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे..