पोलिस आयुक्तालयापासून हकेच्या अंतरावर भरदिवसा गोळीबार, जखमी झालेल्याची प्रकृती चिंताजनक
याबाबत अधिक माहिती घेण्याचे काम चालू असल्याचे सांगण्यात आले आहे.
पोलिस आयुक्तालयापासून हकेच्या अंतरावर भरदिवसा गोळीबार, जखमी झालेल्याची प्रकृती चिंताजनक
बारामती वार्तापत्र रिपोर्ट
पोलीसनामा ऑनलाइन – पुणे (pune) शहरात दिवसाढवळया गोळीबार झाल्याची घटना पोलिस आयुक्त कार्यालयापासून हकेच्या अंतरावर घडल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. सोमवारी पहाटेच्या समोरास खराडी येथे एका तडीपार गुंडाचा खून झाल्याची घटना घडली होती. त्या घटनेला काही तास पुर्ण होत नाहीत तोपर्यंत शहरात आणखी एक खूनाची घटना घडली आहे. पोलिस आयुक्तालयापासून हकेच्या अंतरावर असलेल्या एसबीआय ट्रेझरीच्या शेजारील फुटपाथवर थांबलेल्या बिल्डरवर गोळीबार झाला आहे. ही घटना सोमवारी दुपारी तीन वाजता घडली असून त्यामध्ये बिल्डरचा मृत्यू झाला आहे.
घोरपडी) असे खून झालेल्या बिल्डरचे नाव आहे. कानाबार यांचा काही जणांशी जागोवरून वाद चालू होता. जागेच्या वादाबाबत न्यायालयात आज तारीख देखील होती. दरम्यान, राजेश कानाबार हे पोलिस आयुक्तालयापासून हकेच्या अंतरावर असलेल्या एसबीआय (ट्रेझरी) शेजारील फुटपाथवर उभे होते. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास मोटारसायकलवरून दोघेजण तेथे आले. त्यापैकी एकाने कानाबार यांच्यावर गोळीबार केला. त्यामध्ये कानाबार हे गंभीर जखमी झाले.
गंभीर जखमी झालेल्या कानाबार यांचा मृत्यू झाल्याची माहिती घटपनास्थळावर उपस्थित असलेल्या पोलिस अधिकार्यांनी दिली आहे. याबाबत अधिक माहिती घेण्याचे काम चालू असल्याचे सांगण्यात आले आहे. गुन्हे शाखेचे अधिकारी आणि इतर अधिकारी देखील घटनास्थळी पोहचली आहेत. घटनास्थळी गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पश्चिम विभागाचे अप्पर आयुक्त डॉ. संजय शिंदे, उपायुक्त स्वप्ना गोरे यांच्यासह अधिकारी व बंडगार्डन पोलीस दाखल झाले आहेत.