पोलीस उपयुक्तांना फुकटची बिर्याणी भोवणार .. ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर गृहमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश
एका कर्मचाऱ्यासोबत झालेले त्यांचे हे संभाषण सोशल मीडियावर व्हायरल

पोलीस उपयुक्तांना फुकटची बिर्याणी भोवणार .. ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर गृहमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश
एका कर्मचाऱ्यासोबत झालेले त्यांचे हे संभाषण सोशल मीडियावर व्हायरल
गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही या ऑडिओ क्लिपची दखल घेतली असून चौकशी करण्याचे आदेश दिले
पुणे :बारामती वार्तापत्र
पोलीस दलातील लाचखोर, कामचुकार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अनेक बातम्या आपण यापूर्वी पाहिल्या असतील. परंतु पुण्यात पोलीस उपायुक्त असलेल्या एका महिला अधिकाऱ्याने आपल्याच एका कर्मचाऱ्याला एसपीची बिर्याणी मोफत आणण्यास सांगितले आहे. एका कर्मचाऱ्यासोबत झालेले त्यांचे हे संभाषण सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही या ऑडिओ क्लिपची दखल घेतली असून चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
परिमंडळ एकच्या पोलीस उपायुक्त प्रियांका नारनवरे यांची ही ऑडिओ क्लिप असल्याचे बोलले जाते. यामध्ये मॅडम आपल्या कर्मचाऱ्याला आपल्या हद्दीत असणाऱ्या एका हॉटेलमधून बिर्याणी आणण्यासाठी सांगत आहेत. तसेच आपल्या हद्दीत असलेल्या हॉटेलमध्ये पैसे का द्यायचे ? असा सवालही त्या विचारतात. या मॅडम आणखी काही खाद्यपदार्थांची नावे सुचवून त्या फुकट आणण्यास बजावत असल्याचे या ऑडिओ क्लिपमध्ये आढळून येत आहे. यासाठी संबंधित पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांशी बोलण्याची तयारीत असल्याचेही दिसून येते. दरम्यान राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आज पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांना या ऑडिओ क्लिपबाबत विचारणा केली असता ते म्हणाले, ‘ मी देखील ती ऑडिओ क्लिप ऐकली आहे. ही गंभीर बाब आहे. पोलीस आयुक्तांना मी चौकशी करून अहवाल देण्याविषयी सांगितले आहे. चौकशीचा अहवाल आल्यानंतर राज्य सरकार यासंबंधी योग्य तो निर्णय घेईल.