पोलीस निरीक्षक यांची खाते निहाय चौकशी व्याहवी :प्रशांत सातव.
आंदोलन करणार आहे असा इशारा कारभारी आण्णा चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव प्रशांत सातव यांनी दिला.

पोलीस निरीक्षक यांची खाते निहाय चौकशी व्याहवी : प्रशांत सातव.
बारामती : वार्तापत्र
बारामती शहर पोलिस स्टेशन चे पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील कर्मचारी यांची खातेनिहाय चौकशी करावी अत्यंत गंभीर प्रकारचे आरोप औदुंबर पाटील यांच्यासह अन्य व्यक्तीवर आहेत. त्यामुळे त्यांची तत्काळ चौकशी करावीच व कारवाई झालीच पाहिजे कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करणार आहे असा इशारा कारभारी आण्णा चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव प्रशांत सातव यांनी दिला.
बारामती तालुक्यातील पत्रकारांशी सातव बोलत होते व या वेळी ज्या तक्रारदारांनी पाटील व अन्य अधिकारी, कर्मचारी यांच्याविरोधात पोलिस अधीक्षक, अपर पोलिसअधीक्षक यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत ते देखील यावेळी उपस्थित होते.
शहरातील एका महिलेने पाटील यांच्यासंदर्भात केलेल्या गंभीर
स्वरूपाच्या आरोपांबाबत तिने १८ मार्च रोजीच जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे लेखी तक्रार केली, परंतु आजवर
त्यावर काहीही कारवाई झालेली नसल्याचे या महिलेच्या कुटुंबीयांनी यावेळी सांगितले.
यासंबंधी महिलेने प्रतिज्ञापत्रही सादर केले आहे. कारवाई झाली नाही साधी चौकशीही अद्याप झालेली नसल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी यावेळी केला.
सातव यांनी याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही पत्र लिहून पाटील
व अन्य अधिकारी, कर्मचारी यांच्या विरोधात चौकशी ची मागणी केली आहे.
नारायण शिरगावकर यांच्यात कडे चौकशी चे काम सोपविले आहे परंतु शिरगावकर याचे सुद्धा या प्रकरणात नाव आहे म्हणून दुसऱ्या सक्षम अधिकाऱ्याकडे ही प्रकरणे चौकशी साठी पाठवली जातील अशी माहीती अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांनी दिली.