स्थानिक

प्रगती नगर येथून चोरीला गेलेली चार चाकी गाडी आरोपी सह ताब्यात

सध्या शहरात दुचाकी,चार चाकी वाहनांची चोरीचे प्रमाण वाढताना दिसत आहे.

प्रगती नगर येथून चोरीला गेलेली चार चाकी गाडी आरोपी सह ताब्यात

सध्या शहरात दुचाकी,चार चाकी वाहनांची चोरीचे प्रमाण वाढताना दिसत आहे.

बारामती वार्तापत्र
बारामती येथील प्रगती नगर ,चिंचकर इस्टेट येथून दिनांक 7 रोजी चार चाकी गाडी चोरीस गेल्याची फिर्याद बारामती शहर पोलीस स्टेशनला दाखल झाली होती. याविषयीची माहिती अशी की प्रगती नगर, चिंचकर इस्टेट येथे राहणारे डॉक्टर रामदास तात्यासो मोरे यांच्या मालकीची चार चाकी गाडी अमेज होंडा कंपनीची चार चाकी गाडी प्रगती नगर ,चिंचकर इस्टेट येथून दिनांक 7 रोजी रात्रीनंतर चोरीस गेली होती.

डॉक्टर रामदास मोरे यांनी 7 तारखेला रात्री कळस ,तालुका इंदापूर येथून आल्यानंतर त्यांच्या राहत्या घरी प्रगतीनगर येथे पार्किंग मध्ये गाडी पार्क केली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी पहिले असता त्यांची चार चाकी गाडी (mh-42 ए एक्स 6126) चोरीस गेल्याची फिर्याद त्यांनी दिली होती.त्याप्रमाणे बारामती शहर पोलीस स्टेशनच्या पोलिसांना गोपनीय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की सदर गुन्ह्यातील होंडा कंपनीची अमेझ कार ही लाकडी रोडने बारामती च्या दिशेने येत आहे. त्यामुळे लागलीच बारामती पोलिसांनी लाकडी रोडवर पेट्रोलिंग व नाकाबंदी करत सदरची गाडी आरोपीसह ताब्यात घेण्यात आली या गुन्ह्यात 850000 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपी मंगेश गौतम भागवत वय 28 रा.कळस, तालुका इंदापूर ,जिल्हा पुणे यास अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल विजय जगताप वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.

नागरिकांनीही सतर्क राहावे

सध्या शहरात दुचाकी,चार चाकी वाहनांची चोरीचे प्रमाण वाढताना दिसत आहे. सामान्य माणूस आपल्या दैनंदिन आर्थिक पुंजीतून प्रसंगी बँकांचे कर्ज काढून वाहन खरेदी करत असतो. अशातच जर आपले वाहन चोरीला गेले तर सामान्य माणसाला नाहक आर्थिक भुर्दंड बसतो. त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी स्वतः खबरदारी घ्यावी,लोखंडी साखळी लाऊन गाडी लॉक करण्याचाही प्रयत्न करावा म्हणजे काहीअंशी चोरीचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!