प्रतीक्षेत असलेल्या उर्वरिततीन जणांचा अहवाल पॉझिटिव आलेला.
आज दिवसभरात १४ व एकूण २३६ झालेली आहे.

प्रतीक्षेत असलेल्या उर्वरिततीन जणांचा अहवाल पॉझिटिव आलेला.
आज दिवसभरात १४ व एकूण २३६ झालेली आहे.
बारामती वार्तापत्र
बारामतीत आज सकाळी १० कोरोना बाधित रुग्ण आढळले होते. त्यानंतर आता आणखी चार रुग्ण आढळले असून दिवसभरातील बाधितांची संख्या १४ वर गेली आहे. तर बारामतीतील एकूण रुग्ण संख्या २३६ वर पोहोचली आहे.
बारामतीत काल झालेल्या तपासनीतील पाचजणांचा अहवाल आलेला नव्हता. आज सायंकाळी हा अहवाल प्राप्त झाला असून त्यामध्ये ३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
तर शिवनगर, माळेगाव येथील एका रुग्णाला कोरोनाची लागण झाल्याचा खासगी प्रयोगशाळेतील अहवाल आला आहे. त्यामुळे आज दिवसभरातील कोरोना रुग्णांची संख्या चौदावर पोहोचली आहे.
नव्याने आढळलेल्या रुग्णांमध्ये बारामती शहरातील भोई गल्लीतील एक, बऱ्हाणपूर येथील एक, माळवाडी लोणी येथे मुंबईहून आलेला एक आणि माळेगाव कारखाना परिसरातील एकाचा समावेश आहे.