
प्रयास त्रिपाठीचे जेईई अॅडव्हान्समध्ये यश
ही परीक्षा एकुण ३६० गुणांची होती.
बारामती वार्तापत्र
जेईई अॅडव्हान्स या परीक्षेचा निकाल नुकताच लागला असून बारामतीतील कॅटलिस्ट त्रिपाठी सायन्स अॅकॅडमीचा विद्यार्थी प्रयास त्रिपाठी याने या परीक्षेत आर्थिक मागास वर्गात देशात १५८ वा क्रमांक मिळविला आहे.
आयआयटी, आयआयएम सारख्या देशातील सर्वोत्तम शिक्षणसंस्थांत प्रवेश मिळण्यासाठी जेईई अॅडव्हान्स ही परीक्षा उतिर्ण होणे आवश्यक असते. प्रयासला या परीक्षेत १८८ गुण मिळाले असून त्याचा देशभरातील क्रमांक १७३३ हा आहे. मात्र आर्थिक मागास वर्गात त्याचा १५८ वा क्रमांक आलेला आहे.
यावर्षी १८ मे रोजी देशभरातील २२४ केंद्रावर जेईई अॅडव्हान्सची परीक्षा घेण्यात आली. ही परीक्षा एकुण ३६० गुणांची होती. या परीक्षेसाठी १.८७ लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी ५४३७८ विद्यार्थ्यांनी या परीक्षेत या मिळविले आहे. यावर्षी कटऑफमध्ये ३० टक्के घट झाली असून गेल्या वर्षी कटऑफ १०९ गुणांचा होता, तर यावर्षी हा कटऑफ फक्त ७६ गुणांवर आलेला आहे.
कानपूर आयआयटीमध्ये प्रवेश घेण्याचे प्रयासचे स्वप्न असून त्याला मिळालेल्या गुणांच्य आधारे त्याला तिथे सहज प्रवेश मिळू शकते असे कॅटलिस्ट त्रिपाठी सायन्स अॅकॅडमीचे संचालक त्रिपाठी सर यांनी सांगितले.