प्रवीण दरेकरांना हायकोर्टाचा दिलासा नाही, कधीही अटक होणार?
कठोर कारवाई होऊ नये आणि दिलासा मिळावा यासाठी दरेकर यांनी उच्च न्यायालयाच याचिका दाखल केली होती.
प्रवीण दरेकरांना हायकोर्टाचा दिलासा नाही, कधीही अटक होणार?
कठोर कारवाई होऊ नये आणि दिलासा मिळावा यासाठी दरेकर यांनी उच्च न्यायालयाच याचिका दाखल केली होती.
मुंबई :प्रतिनिधी
विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना हायकोर्टाकडून सर्वात मोठा झटका बसला आहे. कारण हायकोर्टाने त्यांना दिलासा देण्यास नकार दिला आहे. मजूर प्रकरणी दाखल गुन्ह्याअंतर्गत अटक न करण्याची मागणी दरेकरांच्या वकिलांनी केली होती. मात्र न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली आहे. अटकपूर्व जामीनासाठी सत्र न्यायालयात याचिका दाखल करा, असे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत. त्यामुळे प्रवीण दरेकरांना मोठा झटका बसला आहे. याप्रकरणी अटकेपासून संरक्षण मिळावं म्हणून दरेकरांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. पण त्यांची याचिका हायकोर्टाने फेटाळली आहे.
प्रवीण दरेकर हे मजूर नसतानाही त्यांनी मजूर असल्याचं दाखवत मुंबै बँक निवडणूक लढवली. त्यावरुन एमआरआय मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा तपास सुरु आहे. या प्रकरणात कठोर कारवाई होऊ नये आणि दिलासा मिळावा यासाठी दरेकर यांनी उच्च न्यायालयाच याचिका दाखल केली होती. मात्र, ही याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. असं असलं तरी जे योग्य कोर्ट आहे तिथे दरेकर दाद मागू शकतात, असंही उच्च न्यायालयाने म्हटलंय. त्यामुळे आता दरेकर कोणत्या कोर्टात धाव घेणार हे पाहावं लागणार आहे.
नेमकं प्रकरण काय?
प्रविण दरेकर यांनी मुंबै बँक (Mumbai Bank) निवडणुकीसाठी मजूर संस्थे अंतर्गत अर्ज दाखल केला आहे. यापूर्वीही दरेकर मजुर संस्थेचे प्रतिनिधी म्हणूनच मुंबै बँकेवर अध्यक्ष म्हणून निवडून आले होते. त्या प्रकरणी आम आदमी पक्षाने आक्षेप घेत पोलिसांत तक्रार केली होती. त्यानंतर आता प्रवीण दरेकर यांच्या मुंबईतील माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.