प्रश्नमंजुषा स्पर्धेत अनेकान्तचे यश
स्पर्धेमध्ये स्कूलच्या ६ वी ते ८ वी या गटाने प्रथम क्रमांक पटकवला.

प्रश्नमंजुषा स्पर्धेत अनेकान्तचे यश
स्पर्धेमध्ये स्कूलच्या ६ वी ते ८ वी या गटाने प्रथम क्रमांक पटकवला.
बारामती वार्तापत्र
कृषी उद्योग मूल शिक्षण संस्थेचे, वसतिगृह विद्यालय, काऱ्हाटी येथे आयोजित केलेल्या गुणोत्सव २०२४- २५ या उपक्रमांतर्गत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा व विविध विषयांतील त्यांची आवड वृद्धिंगत व्हावी या हेतूने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
त्यातील प्रश्नमंजुषा ही स्पर्धा गुरुकुल इंग्लिश मिडीयम स्कूल येथे पार पडली. या स्पर्धेमध्ये अनेकान्त इंग्लिश मिडियम स्कूलमधील इ. ३ री त ५ वी या गटाने द्वितीय क्रमांक पटकावला. रोख रक्कम, स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्रक असे बक्षीसाचे स्वरूप होते. या गटात पावी सोनटक्के, अनुश्री खराडे, श्रीहरी पुराणिक, रनक शहा या विद्यार्थ्यांचा समावेश होता.
तसेच याच स्पर्धेमध्ये स्कूलच्या ६ वी ते ८ वी या गटाने प्रथम क्रमांक पटकवला. रोख रक्कम, स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्रक असे बक्षीसाचे स्वरूप होते. या गटात स्वरा माने, सार्थक गार्डी, अर्णव चव्हाण, तनुश्री झगडे या विद्यार्थ्यांचा समावेश होता. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शालेय व्यवस्थापन समिती, प्राचार्या, उपप्राचार्या, सर्व शिक्षक वृंद व पालक यांनी त्यांचे कौतुक केले.