प्रसाद खरतोडे यांची बारामती वकील संघटनेच्या अध्यक्षपदी ४५ मतांनी विजयी
मी संघटनेच्या प्रगतीसाठी आणि वकिलांच्या हितासाठी कटिबद्ध राहीन.”

प्रसाद खरतोडे यांची बारामती वकील संघटनेच्या अध्यक्षपदी ४५ मतांनी विजयी
मी संघटनेच्या प्रगतीसाठी आणि वकिलांच्या हितासाठी कटिबद्ध राहीन.”
बारामती वार्तापत्र
प्रसिद्ध कायदेविशारद श्री. प्रसाद खरतोडे यांनी बारामती वकील संघटनेच्या अध्यक्षपदाची निवडणूक ४५ मतांनी जिंकून यशस्वीपणे बाजी मारली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरली असून, श्री. खरतोडे यांच्या नेतृत्वगुणांना व त्यांच्या कार्यक्षमतेला वकिल बांधवांनी भरभरून पाठिंबा दर्शविला.
उपाध्यक्षपदी अॅड. अनुप चौगुले, अॅड. हर्षदा जगदाळे यांनी विजय मिळविला.
अॅड. प्रसाद खारतोडे यांना ५०७ मते तर प्रतिस्पर्धी अॅड. नितीन भामे यांना ४५२ मते मिळाली. यावेळी ९८१ जणांनी मतदानाचा हक्क बजावला. बारामती वकील संघटनेची निवडणूक (दि.५) खेळीमेळीत पार पडली. अध्यक्ष पदासाठी तीन तर उपाध्यक्ष पदासाठी चार उमेदवार रिंगणात होते. सचिव, सहसचिव, खजिनदार व विशेष महिला प्रतिनिधी ही पदे बिनविरोध करण्यात आली. अध्यक्षपदासाठी अॅड. प्रसाद खारतुडे, अॅड. नितीन भामे व अविनाश गायकवाड हे तीन उमेदवार रिंगणात होते. अॅड. प्रसाद खारतुडे यांनी विजय मिळविला. उपाध्यक्षपदासाठी अॅड. अनुप चौगुले, अॅड. हर्षदा जगदाळे, अॅड. शकीला मेहमूद अत्तार, अॅड. अमोल वामन आटोळे हे चार उमेदवार रिंगणात होते. अॅड. अनुप चौगुले व अॅड. हर्षदा जगदाळे यांनी विजय संपादन केला. सचिवपदी अॅड. विजय कांबळे, सहसचिवपदी अॅड. श्वेता वनवे, खजिनदारपदी अॅड. संदीप बनसोडे, ग्रंथपालपदी अॅड. राम सूर्यवंशी तर महिला प्रतिनिधी अॅड. मोनिका कोठावळे-निलाखे यांची बिनविरोध निवड झाली.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अॅड. डी. टी. शिपकुले, अॅड. विजय तावरे, अॅड. सुनील आटोळे, अॅड. अनिल पाटील, अॅड. अजित बनसोडे, अॅड. नितीन अवचट, अॅड. रेश्मा आदलिंगे, अॅड. विकी पोरे, अॅड. ओंकार फडतरे, अॅड. सोगमाथ पाटोळे यांनी काम पाहिले.