प्रहार अपंग क्रांती संस्था व प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने इंदापूर नगरपरिषदे समोर विविध मागण्यासाठी धरणे आंदोलन
अनेक संघटनांचा आंदोलनास पाठिंबा.
प्रहार अपंग क्रांती संस्था व प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने इंदापूर नगरपरिषदे समोर विविध मागण्यासाठी धरणे आंदोलन
अनेक संघटनांचा आंदोलनास पाठिंबा.
इंदापूर:-सिद्धार्थ मखरे ( तालुका प्रतिनिधी )
आज ( दि.५ ) रोजी प्रहार अपंग क्रांती संस्था व प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने अपंगाच्या न्याय हक्कासाठी त्यांच्या विविध मागण्यांच्या संदर्भात इंदापूर नगरपरिषद समोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी आमच्या मागण्या मान्य करा,कोण म्हणतंय देत नाही घेतल्या शिवाय रहात नाही अशा मागण्यांसंदर्भात घोषणाबाजी करत प्रशासनाचे लक्ष वेधले.
या आंदोलनास अनेक सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी पाठिंबा दिला.
या वेळी प्रहार अपंग क्रांती संस्थेच्या वतीने पुढील प्रमाणे मागण्या करण्यात आल्या आहेत.
१) अपंगाचा ५% निधी हा दरवर्षी अपंगाच्या खात्यावर वर्ग करावा. २) शासन निर्णयानुसार सर्व अपंगाला विनार्शत घरकुल देण्यात यावे.
३) जे अपंग बांधव आहेत, त्यांना त्यांच्या घरपट्टीमध्ये ५०% सवलत देण्यात यावी.
४) सर्व अपंगांना गाळयासाठी किंवा टपरी किंवा लोखंडी स्टॉलसाठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी.
५) अपंगांसाठी राखीव असणाऱ्या न.पा.च्या गाळे लिलाव न होता, शासकिय नियमानुसार फीस भरून अपंगांना देण्यात यावेत. व लिलावाची तरतुद असेल तर तो जि.आर आम्हाला देण्यात यावा. ६) अपंगाच्या बचत गटाला व्यावसायासाठी कर्ज देण्यात यावे व त्यांच्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात यावेत.
७) न.पा.मधील अपंगांच्या सर्व जागा भरण्यात याव्यात.
८) अपंगांच्या समस्या सोडविण्यासाठी न.पा. मध्ये स्वतंत्र कक्ष तयार करून एका अपंग कर्मचाऱ्याची त्याठिकाणी कायमस्वरूपी नेमणूक करावी.
अशा विविध मागण्यांसंदर्भातील निवेदन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ.प्रदिप ठेंगल,नगराध्यक्षा अंकिता शहा यांच्याकडे देण्यात आले.
यावेळी नगराध्यक्षा अंकिता शहा यांनी आपल्या मागण्या रास्त असून त्या मागण्या मान्य करत आहोत असे यावेळी सांगून आंदोलनकर्त्यांना लेखी पत्र दिले.
यावेळी प्रहार अपंग संस्थेचे पुणे जिल्हा अध्यक्ष महिंद्र निंबाळकर, कार्याध्यक्ष बाबासाहेब जगताप,प्रहार अपंग क्रांती संस्थेचे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब पाडोळे,उपाध्यक्ष सुरेश जगताप,शहराध्यक्ष दीपक आरडे,प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष संजय राऊत,उपाध्यक्ष शशिकांत सोनटक्के,शहर अध्यक्ष अनिल मोहिते, भटके विमुक्त संघटनेचे नेते तानाजीराव धोत्रे तसेच मनसेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र हजारे,डॉ.माने,क्रांती ज्योती विचारमंच प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे,अनिल पवार,सुंदर पुसाळकर व अन्य उपस्थित होते.