प्रांताधिकार्यांनी मारली सायकलवर रपेट
केले ,88, किलोमीटर सायकलिंग
बारामती वार्तापत्र
महसूल विभागाचे प्रमुख म्हणून प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे हे काम करतात दैनंदिन जीवनात व्यस्त कामातून वेळ काढत आज 81 किलोमीटर सायकलवर रपेट मारली. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त बारामती सायकल क्लब यांच्यावतीने 81 किलोमीटरचे भव्य सायकलिंग रॅली चे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये दादासाहेब कांबळे यांनी आपला सहभाग नोंदवला. बारामतीतून सुरू झालेला सायकलिंग चा प्रवास सोमेश्वर निरा व परत बारामती असा एकूण 81 किलोमीटरचा सायकलिंग प्रवास पार पडला. इंधन बचत व निरोगी आरोग्यासाठी सायकल गरजेची आहे. वाहनाचा अतिरेकी वापर त्यांमधून होणारे प्रदूषण यावर सायकल हा एकमेव उपाय आहे असे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी सांगितले यावेळी बारामती सायकल क्लब चे सर्व सदस्यांनी ही प्रांत अधिकाऱ्यांचे कौतुक केले.