प्राचार्य डॉ. भरत शिंदे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ‘उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार’ जाहीर
१४ विद्यार्थ्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. पदवी प्राप्त

प्राचार्य डॉ. भरत शिंदे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ‘उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार’ जाहीर
१४ विद्यार्थ्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. पदवी प्राप्त
बारामती वार्तापत्र
विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत शिंदे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्त २०२५ चा ‘उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार’ जाहीर झाला आहे. शैक्षणिक गुणवत्ता वाढ, संशोधन, नवकल्पना, तसेच विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांत मिळालेल्या संधी या सर्व निकषांवर त्यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली असल्याने हा सन्मान त्यांना प्रदान केला जात आहे.
डॉ. भरत शिंदे यांनी महाविद्यालयाच्या शैक्षणिक प्रगतीसाठी मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयास NAAC कडून A+ दर्जा प्राप्त झाला आहे.
तसेच, करिअर कट्टा अंतर्गत आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेत महाविद्यालयाने प्रथम क्रमांक मिळवत एक लाख रुपयांचे पारितोषिक पटकावले. मागील चार वर्षांत ३०४ विद्यार्थी एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.
सांस्कृतिक, क्रीडा आणि शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत विविध पुरस्कार जिंकले आहेत.
प्राचार्य डॉ. शिंदे यांची शैक्षणिक आणि संशोधनातील कामगिरीसुद्धा अत्यंत उल्लेखनीय आहे. त्यांनी ८० राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संशोधन निबंध प्रसिद्ध केले असून, ३० क्रमिक पुस्तके आणि ११ राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुस्तके प्रकाशित केली आहेत.
१४ विद्यार्थ्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. पदवी प्राप्त केली आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने डॉ. शिंदे यांना यापूर्वी चार वेळा सन्मानित केले आहे.
१) १९९० साली एमएससी परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवून सिल्व्हर जुबली सुवर्णपदक आणि डॉ. टी.एस. महाबळे सुवर्णपदक.
२) २०१० साली ‘उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार.’
३) २०११ साली ‘उत्कृष्ट संशोधक पुरस्कार.’
४) २०२३ साली ‘उत्कृष्ट महाविद्यालय’ पुरस्कार- प्राचार्य म्हणून सन्मान.
डॉ. शिंदे यांना १० फेब्रुवारी २०२५ रोजी उत्कृष्ट प्राचार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. त्यांच्या या यशाबद्दल विद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार, उपाध्यक्ष अँड अशोक प्रभुणे सचिव ॲड नीलीमा गुजर राज्याचे उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार, खासदार सौ सुनेत्रा पवार खासदार सौ सुप्रियाताई सुळे तसेच संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.