प्राथमिक शाळांची वीज आकारणी घरगुती दराने करावी : स्वप्नील सावंत
ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना दिले निवेदन
प्राथमिक शाळांची वीज आकारणी घरगुती दराने करावी : स्वप्नील सावंत
ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना दिले निवेदन
इंदापूर : प्रतिनिधी
जिल्हा परिषद शाळांमध्ये सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. डिजिटल शाळांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी,ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी तसेच ई-लर्निंग सारख्या शैक्षणिक उपक्रमांपासून विद्यार्थी वंचित राहू नयेत म्हणून सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळांची वीज आकारणी घरगुती दरानुसार करावी जेणेकरून वीजबिल भरणे सोयीचे होईल अशी मागणी इंदापूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष स्वप्निल सावंत यांनी राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांकडे केली आहे.
राज्यातील सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना सध्या पब्लिक सर्विस मधून वीज आकारणी होत आहे. त्यामुळे प्रति महिना ती आकारणी ३७३ रुपये पडत असून प्रति महिना कमीत कमी ३७३ ते १ हजार रुपये पर्यंतचे वीजबिल शाळांना येत आहे. वर्षाचे १० ते १२ हजार रुपयांपर्यंत बिल भरणे जिल्हा परिषदेच्या शाळांना अशक्यप्राय आहे. वीजबिल भरण्यासाठी शासकीय अनुदान मिळत नाही.त्यामुळे शाळांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला असल्याचे सदरील निवेदनात म्हटले आहे.यावेळी इंदापूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष स्वप्नील सावंत,किसान सेलचे अध्यक्ष डॉ.संतोष होगले उपस्थित होते.