प्रामाणिकपणा असावा तर असा! आर्थिक चणचणीच्या काळातही बारामतीतील जलतरणत सापडलेली सोन्याची चेन परत
तब्बल तीन तास शोध घेतल्यानंतर त्यांना चेन सापडली.

प्रामाणिकपणा असावा तर असा!
आर्थिक चणचणीच्या काळातही बारामतीतील जलतरणत सापडलेली सोन्याची चेन परत
तब्बल तीन तास शोध घेतल्यानंतर त्यांना चेन सापडली.
बारामती वार्तापत्र
बारामतीतील वीर सावरकर जलतरण तलावात पडलेली सोन्याची चेन शोधून ती मूळ मालकाला परत करणारा प्रामाणिकपणा करण शेंडगे ऊर्फ मुन्ना यांनी दाखवला. त्यांच्या या दातृत्वाचं कौतुक करत गुरुवारी (3 एप्रिल 2025) तलावाचे ज्येष्ठ सल्लागार आणि माजी नगराध्यक्ष जवाहर शहा (वाघोलीकर) यांच्या हस्ते करण यांचा सत्कार करण्यात आला.
त्यांच्या प्रामाणिकपणाची सर्वत्र प्रशंसा होत आहे.
कोकणातून क्रिकेट सामन्यासाठी बारामतीत आलेले कांबळे हे वीर सावरकर जलतरण तलावावर पोहण्यासाठी गेले होते. पोहताना त्यांची दोन तोळ्याची सोन्याची चेन तलावात पडली. दुसऱ्या दिवशी ही बाब त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तलावावर येऊन माहिती दिली. तलावाचे जीवरक्षक करण शेंडगे यांनी कांबळे यांचा मोबाइल नंबर घेऊन ठेवला आणि तलाव शांत झाल्यावर पाण्यात उतरले. तब्बल तीन तास शोध घेतल्यानंतर त्यांना चेन सापडली. त्यांनी कांबळे यांना बोलावून ती त्यांना परत केली.
या प्रसंगी तलावाचे माजी सचिव प्रवीण आहुजा, संचालक बाळासाहेब टाटीया, उपाध्यक्ष चंद्रगुप्त वाघोलीकर, सुनील जामदार, राहुल नेवसे, अशोक शेरकर, बाळासाहेब देवकाते, नामदेव मदने, सचिव विश्वास शेळके, अध्यक्ष डॉ. अशोक तांबे आणि व्यवस्थापक सुनील खाडे उपस्थित होते. सर्वांनी करणच्या प्रामाणिकपणाचं आणि कष्टाचं कौतुक केलं. हा सत्कार समारंभ तलावावर आयोजित करण्यात आला होता, जिथे त्यांच्या कार्याला सलाम ठोकण्यात आला. करणच्या या कृतीने प्रामाणिकपणाचं उत्तम उदाहरण सर्वांसमोर ठेवलं आहे.