प्रा. डॉ. निळकंठ ढोणे यांची इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट-जम्मू मध्ये प्राध्यापक पदी नियुक्ती
प्रा. डॉ. निळकंठ ढोणे ह्यांचे ह्या निवडी बद्धल सर्वच क्षेत्रातून अभिनंदन केले जात आहे.

प्रा. डॉ. निळकंठ ढोणे यांची इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट-जम्मू मध्ये प्राध्यापक पदी नियुक्ती
प्रा. डॉ. निळकंठ ढोणे ह्यांचे ह्या निवडी बद्धल सर्वच क्षेत्रातून अभिनंदन केले जात आहे.
बारामती वार्तापत्र
प्रा. डॉ. निळकंठ ढोणे यांची अत्यंत प्रतिष्टित अश्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट- जम्मू मध्ये प्राध्यापक पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. देशभरामध्ये व्यवसाय प्रशिक्षण क्षेत्रात एकूण वीस इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आय. आय. एम.) कार्यरत असून त्या सर्व भारत (केंद्र) सरकारच्या अखत्यारीत येतात . त्यामध्ये विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करण्यासाठी आंतराष्ट्रीय दर्जाच्या प्राध्यापकांना नियुक्त केले जाते.सदरच्या पदावरती नियुक्ती करिता सुमारे १२२ जणांना निमंत्रित करण्यात आलेले होते. शैक्षणिक गुणवत्ता, शिकवण्याची पद्धती,आंतर राष्ट्रीय प्रकाशने या त्रिसूत्री वरती प्राध्यापकपदी निवड केली गेली . महाराष्ट्रातून प्रथमच नियुक्त होण्याचा बहुमान बारामती चे सुपुत्र प्रा.डॉ.निळकंठ ढोणे यांना मिळालेला आहे.
आमच्या आमच्या प्रतिनिधींशी संवाद साधतांना प्रा.डॉ. निळकंठ ढोणे म्हणाले की “ज्या प्रमाणे यूपीएससीमध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा टक्का वाढविण्यासाठी महाराष्ट्र सरकार जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहे त्याच पद्धतीने आय.आय. एम., आय.आय.टी. तसेच ए.आय.आय.एम.एस. आणि एन. आय.टी. मधील विद्यार्थी आणि शिक्षकांची निवड होण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजे जेणेकरून महाराष्ट्रातील विशेषतः ग्रामीण विद्यार्थ्यांना उद्योग आणि व्यापारामध्ये अनेक सुसंधी प्राप्त होतील तसेच माझी आय. आय. एम. जम्मू मधील प्राध्यापक पदी निवड ही एक त्या दृष्टीकोनातून सुरुवात आहे असे मी मानतो “.
प्रा. डॉ. निळकंठ ढोणे यांनी अभियांत्रिकीची पदवी बारामती मधून शिवनगर विद्या प्रसारक मंडळाच्या कॉलेज ऑफ इंजीनियरिंग मधून घेतलेली आहे तसेच त्यांनी एम.बी .ए चे पदव्युत्तर शिक्षण हे सिंहगड इन्सिट्युट ऑफ मॅनेजमेंट पुणे, येथून घेतलेले आहे.तसेच प्रा. निळकंठ ढोणे हे यु. जी.सी. (नेट-मॅनेजमेंट)ही परीक्षा उत्तीर्ण असून त्यांनी पी.एच.डी.(डॉक्टरल डिग्री) ही आंतरराष्ट्रीय स्तरावरती नावाजलेल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल इंजीनियरिंग (निटी-मुंबई) येथून पूर्ण केलेले आहे. त्यांना सोळा वर्षाचा एम.बी .ए मधील शैक्षणिक अध्यापनाचा अनुभव असून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये ते संशोधक मार्गदर्शक म्हणून पी. एच. डी.च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत.
उल्लेखनीय बाब म्हणजे फेब्रुवारी 2019 रोजी प्रा. डॉ. निळकंठ ढोणे यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सहा. कुलसचिव पदी (गट अ) या पदावर ती देखील नियुक्ती झालेली होती. हे पद विद्यापीठाच्या कामकाजातील अत्यंत जबाबदार आणि ताकदीचे मानले जाते.
प्रा डॉ निळकंठ ढोणे यांनी विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संशोधन परिषदेतून आपले शोधनिबंध सादर केलेले आहेत तसेच त्यांचे शोधनिबंध अमेरिका ब्रिटन, स्विझर्लंड, जपान येथील जागतिक दर्जाच्या टेलर अँड फ्रान्सिस,स्कोपस, इंडरसायन्स ह्या नियतकालिकांमधून प्रसिद्ध झालेले आहेत आणि त्यातील दोन शोध निबंधांना ‘बेस्ट रिसर्च पेपर ‘ मोस्ट साईटेड रीसर्च पेपर ऑफ दि इयर ‘ असे पुरस्कार देखील मिळाले आहेत.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा संशोधन ट्रस्ट पुणे यांचे संयुक्त विद्यमाने दिला जाणारा “सर्वोत्कृष्ट संशोधक पुरस्कार 2015” देखील प्राप्त झाला आहे.
प्रा. डॉ. निळकंठ ढोणेहे लेखक आणि प्रेरणादायी व्याख्याते असून करियर समुपदेशक म्हणून देखील काम करत असतात.ते सामाजिक कार्यात देखील अग्रेसर असून रोटरी क्लब बारामती,नेस्ट फाउंडेशन, माता रमाई प्रतिष्ठान,शब्दधन सोशल फाउंडेशन यांच्या माध्यमातून विविध समाज उपयोगी कामात नेहमीच सहभागी असतात.
प्रा. डॉ. निळकंठ ढोणे ह्यांचा संपूर्ण परिवार शैक्षणिक क्षेत्राशी निगडित असून त्यांचे आई सौ. सिंधू आणि वडील श्री. चंद्रकांत ढोणे हे दोघेही बारामती नगर परिषदेच्या प्रशाळेतून निवृत्त मुख्याध्यापक असून त्यांचे पत्नी सौ. नम्रता निळकंठ ढोणे ह्या बारामती नगर परिषदेच्या प्रशाळेत तज्ञ् विषय शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. प्रा. डॉ. निळकंठ ढोणे ह्यांचे ह्या निवडी बद्धल सर्वच क्षेत्रातून अभिनंदन केले जात आहे.