एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीला हिरवा कंदील,संप मागे घेण्याची शक्यता

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात बैठक सुरू झाली आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीला हिरवा कंदील,संप मागे घेण्याची शक्यता

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात बैठक सुरू झाली आहे.

प्रतिनिधी

विविध मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्याचा संप  सुरू आहे. कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावे यासाठी सरकारकडून आव्हान करण्यात येत आहे तर भाजपसह इतर संघटनांकडून एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठींबा दिला जात आहे. संपाबाबात तोडगा निघावा यासाठी परिवहन मंत्री अनिल परब ,आमदार गोपीचंद पडळकर व सदाभाऊ खोत  यांच्यात बैठक झाली होती. याच विषयावर दुसरी बैठकही झाली असून दुसऱ्या बैठकीत एसटी कामगार शिष्टमंडळ परिवहन मंत्र्यांसमोर आपली भूमिका मांडणार आहे. दरम्यान, अर्थमंत्री अजित पवारयांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीला हिरवा कंदील दिला असून यासाठी राज्याच्या तिजोरीवर 600 कोटींचा अतिरिक्त भार पडणार आहे. दरमहिन्याला 50 कोटींचा अतिरिक्त भार महामंडळाला पडणार आहे.

– उदया (गुरुवारी) कामावर हजर होण्याची कर्मचाऱ्यांना विनंती.

– विलिनिकरणाशिवाय संप मागे घेणार नाही, अशी कर्मचारी संघटनांची माहिती.

– एसटी कर्मचारी संघटना मात्र विलिनिकरणावर ठाम.

– अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन पगार वाढीची माहिती केली जाहीर.

– मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्यावर परव सह्याद्रीकडे रवाना.

– अनिल परब मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला.

– अनिल परब यांनी घेतली अजित पवारांची भेट.

– पगारवाढीमुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर पडणार 600 कोटींचा भार.

– एसटी कर्मचारी संप मागे घेण्याची शक्यता, सुत्रांनी दिली माहिती.

– एसटी कर्मचाऱ्यांना पगारवाढ दिली जाणार असल्याची माहिती.

शरद पवारांनी दिली होती सूचना

एसटी कर्मचाऱ्यांचा संपाबाबत काल (दि. 23) परिवहन मंत्री अनिल परब यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली होती. यावेळी शरद पवार यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतानात वाढ करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्याचबरोबर अर्थमंत्री अजित पवार यांना विशेष तरतूद करून एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करण्याच्या सूचनाही दिल्या होत्या.

‘या’ विषयांवर झाली चर्चा

  • गेल्या 10-12 वर्षांत नव्याने लागलेल्या कर्मचाऱ्यांचे वेतन अत्यंत कमी आहे.
  • प्रामुख्याने या कर्मचाऱ्यांना अधिक वेतनवाढ दिली जाईल.
  • किमान 5 ते 7 हजार रुपयांपर्यंत वाढ देण्याचा प्रस्ताव
  • ज्या कर्मचाऱ्यांचे बेसिक वेतन साडेबारा हजार रूपये आहे. त्यांचे वेतन साडे अठरा हजार रुपयांच्या आसपास करण्याचा विचार एसटी महामंडळ प्रशासन करत आहे.
  • ज्या वरिष्ठ कर्मचाऱ्यांचे वेतन 50 हजारांपेक्षा जास्त आहे. त्यांना कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या तुलनेत कमी वेतन वाढ दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!