फडणवीसां पाठोपाठ आठवले ही बारामतीत,नुकसानग्रस्त भागाची करणार पाहणी
कऱ्हा वागज आणि शहरातील पंचशील नगर येथे अतिवृष्टी मुळे झालेल्या नुकसानी ची पहाणी करणार आहेत.
फडणवीसां पाठोपाठ आठवले ही बारामतीत,नुकसानग्रस्त भागाची करणार पाहणी
कऱ्हा वागज आणि शहरातील पंचशील नगर येथे अतिवृष्टी मुळे झालेल्या नुकसानी ची पहाणी करणार आहेत.
बारामती वार्तापत्र
माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पाठोपाठ आता उद्या शुक्रवार दि.२२ ऑक्टोबर रोजी केंद्रीय मंत्री रामदास आठवले देखील बारामती दौऱ्यावर येत आहे.या दौऱ्या दरम्यान केंद्रीय मंत्री आठवले हे बारामतीत शहर परिरासारतील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची पाहणी करणार असल्याची माहिती रिपाई (ए) चे पुणे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे यांनी दिली.
राज्यात आठवड्याभरा पूर्वी झालेल्या अतिवृष्टी मुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे तर काही ठिकाणी पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे अनेक नागरिकांच्या घरात पुराचे पाणी गेल्या मुळे अनेकांची कुटुंबे उध्वस्त झाली आहेत.त्याच पार्श्वभूमीवर आता उद्या केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे बारामतीत तालुक्यातील कऱ्हा वागज आणि शहरातील पंचशील नगर येथे अतिवृष्टी मुळे झालेल्या नुकसानी ची पहाणी करणार आहेत.
दरम्यान,नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून झाल्यानंतर केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे एक पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांशी संवाद साधणार असल्याची माहिती जिल्हा सचिव सुनिल शिंदे यांनी दिली.