फेसबुकवरून उपराष्ट्रपती आणि मध्यप्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते वैभव सोलनकर यांनी या विषयी फिर्याद दिली आहे.
फेसबुकवरून उपराष्ट्रपती आणि मध्यप्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते वैभव सोलनकर यांनी या विषयी फिर्याद दिली आहे
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि मध्यप्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती यांचा फोटो वापरून आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बारामती तालुका पोलिस ठाण्यात हा गुन्हा वैभव सोलनकर यांनी दाखल केला आहे.
फेसबुकवरून उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि मध्यप्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती यांचा फोटो वापरुन दोन दिवसांपूर्वी आक्षेपार्ह भाषेत काही विधाने करण्यात आली होती. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते वैभव सोलनकर यांनी या विषयी फिर्याद दिली आहे. पूजा झोळ या नावाच्या फेसबुक अकाउंटवरून ही पोस्ट करण्यात आली असल्याचे वैभव सोलनकर यांनी म्हटले आहे. या प्रकरणी बारामती तालुका पोलिस ठाण्यात भा.द.वि. कलम 5050(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देशाच्या उपराष्ट्रपतींबद्दल अत्यंत असभ्य भाषेत अशी पोस्ट करणे हा लोकशाहिचा अतिरेक म्हणावा लागेल. अशी भाषा वापरणाऱ्यांवर कारवाई व्हायलाच हवी, असे वैभव सोलनकर म्हणाले. दरम्यान, देशाच्या उपराष्ट्रपतींबद्दलच्या विधानाचा हा गुन्हा असल्याने आता पोलिस याबाबत काय भूमिका घेतात, याकडेच सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.