फेसबुक वरून महिलांची बदनामी करणाऱ्यास अटक : नारायण शिरगावकर.
सावधान सोशल मीडियावर मैत्री करू नका.
फेसबुक वरून महिलांची बदनामी करणाऱ्यास अटक : नारायण शिरगावकर.
सावधान सोशल मीडियावर मैत्री करू नका.
बारामती:वार्तापत्र
सोशल मीडियावर ओळख करून नंतर बदनामी करणाऱ्या आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे. अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी दिली या बाबत सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे.
बारामती तालुका स्टेशन गु र नं 375/2020 भादंवि 353 (c) , आय टी अक्ट 67,67a प्रमाणे दाखल आहे नमूद गुन्ह्यातील अज्ञात आरोपी हा गणेश खरात बनावट फेसबुक ac वरून शेकडो महिलांना facebook वरती request पाठवून त्याचे profile वरील फोटो क्रॉप करून त्यांचा चेहरा वापरून महिलांचे अशील फोटो तयार करून त्यांना माझ्याशी बोल मैत्री कर नाहीतर असे फोटो मी व्हायरल करिन अशी धमकी दयायचा .
सदर गुन्ह्याचा तपास बारामती तालुका पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सपोनि योगेश लंगुटे पोलीस नाईक परिमल मानेर पोलीस कॉन्स्टेबल नंदू जाधव पोलीस कॉन्स्टेबल मंगेश कांबळे पोलीस कॉन्स्टेबल विनोद लोखंडे यांनी तांत्रिक बाबी च्या साह्याने आरोपी नामे संदीप सुखदेव हजारे वय 29 वर्षे रा आंबवडे ता खटाव जि सातारा यास दहिवडी येथून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे तपासामध्ये आरोपी यांचेवर समर्थ पोलीस पुणे , घारगाव पोलीस स्टेशन जि अ नगर , कराड पोलीस जि सातारा ,संगमनेर पोलीस स्टेशन जि रत्नागिरी या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असून महाराष्ट्रा मध्ये आणखी पोलीस स्टेशन ला गुन्हे दाखल असण्याची शक्यता आहे .
तरी नमूद आरोपी याच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्यास बारामती तालुका पोलीस स्टेशन ला संपर्क साधावा पोलीस स्टेशन नं 02112- 223433 या नंबर वरती संपर्क करण्याचे आव्हान पोलिसांनी केले आहे.