स्थानिक

बनावट कागदपत्र प्रकरणी तालुका पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल.

बनावट नोटरी व भाडेपट्टा बनवून फसवणूक.

बनावट कागदपत्र प्रकरणी तालुका पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल

बनावट नोटरी व भाडेपट्टा बनवून फसवणूक.

बारामती :वार्तापत्र

बारामती मध्ये फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

बनावट नोटरी व भाडेपट्टा बनवून त्याचा न्यायालयीन कामासाठी वापर केल्याप्रकरणी गीतांजली हनुमंत नाझीरकर भास्कर हनुमंत नाझीरकर (रा.स्वप्नशिल्प, अपार्टमेंट कोथरूड. पुणे) व हेमंत प्रल्हाद पोंद्कुले या तिघांवर बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत संग्राम तानाजी सोरटे ( रा. मगरवाडी ता. बारामती) यांनी फिर्याद दिली आहे. सदर घटना ९ डिसेंबर २०१९ ते २६ जून २०२० दरम्यान बारामतीतील विद्युत महामंडळाच्या कार्यालयात घडली.

विद्युत पुरवठा कायम राहावा यासाठी सदर कागदपत्रांचा वापर करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

फिर्यादी व त्यांचा भाऊ प्रवीण सोरटे यांच्या नावे बनवट नोटरी, भाडे करार व भाडेपट्टा बनवून ते खरे असल्याचे भासवत नाझीरकर व पोंदकुले यांनी सदर कागदपत्रे विद्युत मंडळाच्या कार्यालयात दाखल केली. याप्रकरणी वरील ठिकाणी तिंघा विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!