स्थानिक

बबलू जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर संपन्न : आयोजित शिबिरात १७२ बाटल्यांचे रक्तसंकलन.

रक्तपेढीतील साठा कमी जाणवू लागल्याने एसएसएस ग्रुपने वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते.

बबलू जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर संपन्न : आयोजित शिबिरात १७२ बाटल्यांचे रक्तसंकलन.

रक्तपेढीतील साठा कमी जाणवू लागल्याने एसएसएस ग्रुपने वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते.

बारामती वार्तापत्र

बारामतीत सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणारे दिनेश उर्फ बबलू जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त एसएसएस ग्रुपतर्फे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीराचे उद्घाटन उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, बारामती बँकेचे चेअरमन सचिन सातव व नगरसेवक जय पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.आयोजित रक्तदान शिबिरामध्ये १७२ रक्तदात्यांनी उत्स्फुर्तपणे रक्तदान केले.

यावेळी उद्योजक संतोष सातव, पुणे जिल्हा समाजकल्याण दक्षता समितीचे सदस्य साधु बल्लाळ, राष्ट्रवादी कॉंग्रेस बारामती शहर कार्याध्यक्ष विशाल जाधव, माजी नगरसेवक आप्पा अहिवळे, राजे ग्रुपचे गणेश कदम, अँड सुशिल अहिवळे, शुभम अहिवळे, गजानन गायकवाड, भारतीय पत्रकार संघाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष तैनुर शेख इ. मान्यवर उपस्थित होते.

शिबीर दरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेस बारामती शहर अध्यक्ष इम्तियाज शिकीलकर, नगरसेवक जयसिंग देशमुख, कुंदन लालबिगे, बिरजु मांढरे, राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला शहर अध्यक्षा सौ.अनिता गायकवाड, बारामती शहर पोलिस निरीक्षक सुनिल महाडिक, शिवसेना शहर प्रमुख पप्पू माने, सचिन सातव, महेश साळुंखे, श्रीजीत पवार, सुरज खलाटे, पत्रकार अभिजीत कांबळे, इ. शुभेच्छा भेट दिली.

रक्तपेढीतील साठा कमी जाणवू लागल्याने एसएसएस ग्रुपने वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते. या रक्तदान शिबीरात १७२ रक्तदात्यांनी रक्तदान केले. याच अनुषंगाने तरूणाईमध्ये रक्तदानाचे महत्व रूजविणे आणि त्यांना रक्तदानासाठी प्रेरित करण्याच्या अनुषंगाने एसएसएस ग्रुपने शिबीराचे आयोजन केले होते.
एसएसएस ग्रुपने स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. रक्तदान ही आजच्या काळाची गरज आहे. अनेकदा वेळेवर रक्त मिळत नसल्याने मृत्यू होण्याच्या घटना कानावर येतात. त्यामुळे तरूणाईने अधिकाधिक रक्तदान करण्याचे आवाहन यावेळी साधु बल्लाळ यांनी केले.

सदर शिबीर यशस्वी करण्यासाठी एसएसएस ग्रुपचे सोनू राठोड, विराज वाघमोडे,राजपाल गायकवाड, गणेश पाठक, विकास जगताप, सनी जगताप, बंटी जगताप, गौरव भंडारी, अजय नागे, धीरज पडकर, बबलु भोसलेमयुर कांबळे, सौरभ चव्हाण इ. कार्यकर्त्यांनी मोलाचे परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram