इंदापूर

बलात्काराची खोटी फिर्याद दिल्याने त्या महिलेला न्यायालयाने फटकारले…

इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर पोलिस ठाण्यामध्ये विवाहितेने एका व्यक्तिविरोधात बलात्काराची फिर्याद दाखल केली होती.

बलात्काराची खोटी फिर्याद दिल्याने त्या महिलेला न्यायालयाने फटकारले…

देशभरासह महाराष्ट्रात बलात्काराच्या अनेक घटना समोर येत असतात काही ठिकाणी महिलांवर ती तसा अन्यायही झालेला असतो पण मात्र काही ठिकाणी अशा घटना नंतर खोट्या ठरविल्या जातात किंवा खोट्या ठरतात अशीच घटना इंदापूर तालुक्यात घडलेली आहे,

अशी माहिती प्रसन्न जोशी ( ॲडव्होकेट) यांनी दिली त्याचा हा व्हिडीओ पहा.

YouTube player

इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर पोलिस ठाण्यामध्ये विवाहितेने एका व्यक्तिविरोधात बलात्काराची फिर्याद दाखल केली होती.

पोलिसांनी त्या व्यक्तीच्या विरोधात  बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले होते, तिने व तिच्या पतीने त्या व्यक्तीकडून ऊसने पैसे घेतले होते. हे पैसे मुदतीत न दिल्याने त्याने पैशाचा तगादा लावत फिर्यादी महिलेकडे शारिरिक संबंधाची मागणी करत, त्या महिलेवर  वेळोवेळी बलात्कार केला.

असे तिने फिर्यादीत म्हटले होते त्यामुळे त्या व्यक्तीस अटक करण्यात आली..

मात्र विशेष बाब म्हणजे काही दिवसातच  या महिलेने तपासादरम्यान पोलिसांसमोर दुसरा जबाब नोंदवत बलात्कार झाला नसल्याचे सांगत केवळ पैशाचा तगादा लावत असल्याने फिर्याद दाखल केली असल्याचे सांगितले. तसे नोटरी प्रमाणपत्र तिने सादर केले.

त्यामुळे उसने घेतलेल्या पैशाच्या वादावरून बलात्काराची फिर्याद देणाऱ्या महिलेन पुन्हा दुसरा जबाब देत ती फिर्याद खोटी असल्याचे मत तिने लिखित स्वरूपात दिले असल्याने बारामती सत्र न्यायालयाने या महिलेस चांगलेच फटकारले आहे, तिच्या या खोट्या फिर्यादी मुळे तिने विनाकारण न्यायालय व पोलिस यंत्रणेचा वेळ खर्ची घातल्याचे निरीक्षण नोंदवत तिच्याविरोधात कडक कारवाई करावी, असे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले.

सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील म्हणून प्रसन्न जोशी यांनी सदर युक्तिवाद केला होता त्यानुसार बारामती अप्पर व जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. आर. राठी यांनी वालचंदनगर पोलिसांना हे आदेश दिले आहेत…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!