बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने आज इंदापूर तहसील कार्यालयावर महागाईच्या विरोधात धक्का मारो आंदोलन करीत दिले निवेदन..!
सात वर्षापासून महागाई कमी होण्याचे नाव घ्यायला तयार नाही

बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने आज इंदापूर तहसील कार्यालयावर महागाईच्या विरोधात धक्का मारो आंदोलन करीत दिले निवेदन..!!
सात वर्षापासून महागाई कमी होण्याचे नाव घ्यायला तयार नाही
इंदापूर प्रतिनिधी : बारामती वार्तापत्र
पेट्रोल,गॅस,तेल महागाई व वाढत्या वीज बिलाच्या विरोधात व केंद्र सरकार राज्य सरकारच्या धोरणांविरोधात बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय महासचिव ॲड.राहुल मखरे यांच्या नेतृत्वाखाली बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने आज (दि.१५) रोजी इंदापूर तहसील कार्यालयावर धक्का मारो आंदोलन करण्यात आले.
यावेळी शेकडो दुचाकी गाड्यांना धक्का मारत इंदापूर नगरपरिषदे पासून तहसील कचेरी पर्यंत महागाई की मार ईव्हीएम की सरकार,काँग्रेस,बीजेपी ने क्या किया?देश का सत्यानाश किया ! , ये सरकार वो सरकार चोर लुटोरो की सरकार,वाह रे मोदी तेरा खेल सस्ती दारू मंहगा तेल अशा विविध घोषणाबाजी करत तशा प्रकारचे फलक दर्शवित शेकडो कार्यकर्ते व महिला सहभागी होत्या.
दरम्यान पेट्रोल-डिझेल गॅसच्या भरमसाठ वाढलेल्या किंमती कमी करा,खाद्यतेल तसेच जीवनावश्यक खाद्य पदार्थांचे भाव कमी करा,वीज बिल माफ करा,महागाई कमी करता येत नसेल तर खुर्ची खाली करा अशा विविध मागण्यांच्या संदर्भातील निवेदन तहसीलदार अनिल ठोंबरे यांना देण्यात आले.
विविध मागण्यांचा निवेदनात म्हटले आहे की, २०१४ पासून सत्तेवर आलेल्या नरेंद्र मोदी भाजप सरकारने महागाई कमी करण्याऐवजी महागाईचा बकासुर निर्माण केला आहे सात वर्षापासून महागाई कमी होण्याचे नाव घ्यायला तयार नाही जीवनावश्यक वस्तूंच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत सर्वसामान्य जनता होरपळून निघत आहे लोकडॉन मुळे दरडोई उत्पन्न घटले आहे दैनंदिन गरजा भागवण्यासाठी जनता जिवाचे रान करीत आहे . अशा प्रकारे मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
यावेळी नानासाहेब चव्हाण,संजय शिंदे,बाबासाहेब भोंग,राहुल शिंगाडे,सुरज धाइंजे,संजय,कांबळे,महेश लोंढे,नेताजी लोंढे,नागेश भोसले,रोहित ढावरे,ॲड.किरण लोंढे,नितीन देशमाने,वसीम शेख,संतोष क्षिरसागर, अतुल काटे,अमोल मारकड, अक्षय मखरे,बलभीम राऊत, मनीषा मखरे,काजल उकिरडे,मनीषा ढावरे,रुपाली शिंदे,यांसह अनेक जणांचा यावेळी सहभाग होता.