बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या सेंट्रींग प्लेट चोरणारा आरोपी बारामती शहर पोलीस कडून ताब्यात
50 प्लेटा 75 हजाराच्या जप्त करण्यात आलेले
बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या सेंट्रींग प्लेट चोरणारा आरोपी बारामती शहर पोलीस कडून ताब्यात
50 प्लेटा 75 हजाराच्या जप्त करण्यात आलेले
क्राईम;बारामती वार्तापत्र
बाबासाहेब बाबूजी आटोळे वय 38 व्यवसाय सेंट्रींग राहणार मळद रोड बारामती यांनी फिर्याद दिली की त्यांची कसबा जामदार रोड या ठिकाणी बांधकामाची साईट चालू आहे त्या ठिकाणी बांधकामासाठी सेंट्रींग ला वापरण्यात येणाऱ्या एकूण 50 लोखंडी प्लेट किंमत75 हजार रुपये च्या चोरी झालेले आहेत त्यांनी सदर बाबत त्यादिवशी रीतसर तक्रार पोलीस ठाण्यात दिली त्या प्रमाणे गुन्हा रजिस्टर नंबर 656 / 21 कलम 379 प्रमाणे दाखल करून घेतला त्या ठिकाणी साइटवर असणाऱ्या वाचमेन ने त्या कामावर असणाऱ्या एका व्यक्ती ने सदर चोरी केल्याची घटना सांगितली होती त्यामुळे त्यालाही त्या गुन्ह्यात अटक केली होती परंतु सदर आरोपीकडून काहीही निष्पन्न झाले नाही.
बारामती शहर पोलीस ठाण्याचे तपास पथक हे या गुन्ह्याबाबत सतत गोपनीय माहिती घेत होती त्याप्रमाणे तपास पथकाच्या गोपनीय बातमी दारा मार्फत माहिती मिळाली की आरोपी नामे बकुळया नकट्या काळे वय 20 वर्ष राहणार मळद भैय्या वस्ती जवळ याने एका विधिसंघर्षग्रस्त बालक सोबत सदरच्या प्लेट चोरलेल्या आहेत सदर माहितीच्या आधारे तपास पथकाने सदर आरोपीला ताब्यात घेऊन त्याला अटक करून त्याच्या ताब्यातून चोरीस गेलेल्या संपूर्ण 50 प्लेटा 75 हजाराच्या जप्त करण्यात आलेले आहेत.
सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक डॉक्टर अविनाश देशमुख अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते विभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुनील महाडिक पोलीस उपनिरीक्षक गणेश पाटील पोलीस हवालदार रामचंद्र शिंदे पोलीस नाईक दशरथ कोळेकर कल्याण खांडेकर पोलीस शिपाई मनोज पवार बंडू कोठे दशरथ इंगोले सचिन कोकणे यांनी केलेली आहे या गुन्ह्यात संशयावरून अटक केलेल्या इसमाला माननीय न्यायालयातून 169 प्रमाणे सोडून देण्याचा रिपोर्ट सादर करण्यात येणार आहे.