बामरातीत कोरोनाच्या दहशतीत पुन्हा वाढ.
काल घेतलेल्या सॅम्पल पैकी तीन जनांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह.
बामरातीत कोरोनाच्या दहशतीत पुन्हा वाढ.
काल घेतलेल्या सॅम्पल पैकी तीन जनांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह.
आज कोरोना बाधित आढळलेल्या रुग्णांमध्ये मारवाड पेठ येथील १,महादेव माळ्यातील १ आणि शाहू कॉम्प्लेक्स मध्ये दोन दिवसांपूर्वी आढळलेल्या रुग्णाच्यासंपर्कातील एकाच समावेश आहे.
बारामती:-प्रतिनिधी
आज दि.१३ जुलै रोजी बारामती शहरात पुन्हा तीन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह सापडले. त्यामुळे आता बारामतीतील कोरोनाग्रस्तांची संख्या ६० वर जाऊन पोहोचली आहे. दरम्यान, अजूनही ४६ जणांचे अहवाल येणे बाकी असल्याने पुन्हा एकदा बारामती करांचा जीव भांड्यात पडल्याचे चित्र आहे. दिवसागणिक रुग्णांची संख्या वाढत असल्याने परिस्थिती चिंताजनक आहे. दुपारी तीननंतर व्यवहार बंद करण्याचे आदेश देण्यात आले असून, दुपारी तीननंतर दुकाने सुरू ठेवणाऱ्यांसह मास्कविना फिरणाऱ्यांवर आता कारवाई होणार आहे.
बारामतीत काल एकाच दिवशी १८ कोरोनाग्रस्त सापडले. त्यामुळे बारामतीकरांमध्ये भीतीदायक वातावरण होते. त्यामुळे बारामतीच्या व्यवहारांवर दुपारी तीन वाजेपर्यंत निर्बंध आणण्यात आले आहेत. या १८ रुग्णांच्या संपर्कातील ६८ जणांचे स्वाब काल घेण्यात आले होते. त्यापैकी २२ जणांचे अहवाल दुपारी साडेबारापर्यंत प्राप्त झाले असून यात तीन रुग्ण कोरोनाग्रस्त असल्याचे समोर आले. तर उर्वरित १९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. दरम्यान, शहरातील ज्येष्ठ नगरसेवकाच्या मुलाचा अहवाल निगेटिव्ह आला असून त्याला आज रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.
दरम्यान, बारामती शहरातील काही खासगी व व्हेंटिलेटर्सची सुविधा असलेली रुग्णालये ताब्यात घेण्याच्या दृष्टीनेही प्रशासनाने तयारी केली आहे. रुग्ण संख्या वाढल्यास त्यांची सोय कोणत्या दवाखान्यात करायची व कोरोनाने मृत्यूमुखी पडलेल्यांवर कोठे अंत्यसंस्कार करायचे, याचेही नियोजन सुरू झाले आहे. शहरात १८ रुग्ण एकाच दिवशी मिळाल्यानंतरही आज लोकांना याचे फारसे गांभीर्य नसल्याचे दिसून आले. बँकासह अनेक ठिकाणी आज मोठी गर्दी पाहायला मिळाली असून वारंवार प्रशासनाने सांगूनही लोक नियमांचे पालन करत नसल्याचे दिसू लागले आहे.