बारामतीकरांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी ‘आर्सेनिक ३०’ चा बुस्ट.
१ लाख कुटुंबांना होणार वाटप: सुनेत्रा पवार यांच्या हस्ते जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्याकडे औषध सुपूर्द.
बारामतीकरांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी ‘आर्सेनिक ३०’ चा बुस्ट.
१ लाख कुटुंबांना होणार वाटप: सुनेत्रा पवार यांच्या हस्ते जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्याकडे औषध सुपूर्द.
बारामती, दि. १८: ‘कोरोना’ विरुद्धच्या लढ्यात बारामतीकरांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी ‘आर्सेनिक ३०’ या होमिओपॅथी औषधांचा ‘बूस्टर डोस’ बारामतीकरांना देण्यात येणार आहे. बारामतीमध्ये १ लाख कुटुंबांना गोळ्यांच्या डब्यांचे वाटप करण्यात येणार असून बारामती हायटेक टेक्स्टाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या हस्ते जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांच्याकडे औषधांच्या ६० हजार डब्या सुपूर्द करण्यात आल्या. आरोग्य विभागामार्फत या गोळ्यांचे वाटप करण्यात येणार आहे.
मुंबई येथील रहिवासी आशिष पोतदार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना एक पत्र पाठवत या ‘आर्सेनिक ३०’ होमिओपॅथी औषधाच्या १ लाख डब्या उपलब्ध करुन देण्याची तयारी दाखवली होती. त्यानुसार या ६० हजार औषधांच्या डब्या देण्यात आल्या आहेत, येत्या चार दिवसात औषधांच्या उर्वरित सर्व ४० हजार डब्या पोचविण्यात येणार आहेत.
यावेळी बोलताना सुनेत्रा पवार म्हणाल्या, “आपण सगळे कोरोनाच्या विरोधातील लढाई ताकदीने लढत आहोत. गेल्या काही दिवसांपासून आपण कोरोनाला हरवण्यासाठी प्रयत्न करत आहोत. कोरोनाच्या लढाईत जे लोक पुढे येत आहेत. त्यांचे कौतुक केले पाहिजे. आपण संघटीतपणे असेच प्रयत्नशील राहिलो तर आपण नक्कीच या रोगावर मात करू.”
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार म्हणाले, “प्रत्येकाने या काळात स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे, स्वतःची काळजी घेत आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवली पाहिजे. ‘अर्सेनिक ३०’ या गोळ्यांच्या माध्यमातून रोगप्रतिकारक शक्ती वाढते असे तज्ज्ञांचे मत आहे. या गोळ्यांचा बारामतीकरांना चांगला उपयोग होणार आहे”.