बारामतीकरांना खबरदारी घेण्याचे स्थानिक प्रशासनाचे आवाहन.
दिवसेंदिवस रुग्णांची संख्या बघता केल्या सूचना.
बारामतीकरांना खबरदारी घेण्याचे स्थानिक प्रशासनाचे आवाहन.
दिवसेंदिवस रुग्णांची संख्या बघता केल्या सूचना.
बारामती वार्तापत्र
बारामती तालुक्यातील दिवसेंदिवस वाढत असणारा कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता स्थानिक प्रशासनाने बारामती करांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.तसेच जे रुग्ण पॉझिटिव्ह आलेले आहेत व ज्या व्यक्ती त्यांच्या संपर्कात आल्या आहेत अशांनी घाबरून न जाता आपल्या ठिकाणी क्वारंटाईन व्हावे प्रशासनामार्फत त्यांच्याशी संपर्क साधला जाईल व पुढील कार्यवाहीसाठी मार्गदर्शन करण्यात येईल, तसेच नागरिकांनी घाबरून न जाता स्वतःची काळजी घ्यावी,लक्षण विरहित रुग्णांनी ॲडमिट होण्यासाठी घाई करू नये सर्वांना संपर्क साधला जाईल व योग्य ते मार्गदर्शन केले जाईल.
अजूनही काही लोक मास्क वापरत नाहीत त्यांनी मास्क वापरणे बंधनकारक आहे व सोशल डिस्टंसिंग पाळणे गरजेचे आहे व सर्व कामावर जाणाऱ्या तरुणांनी कामावरून घरी आल्यानंतर आपल्या ज्येष्ठ आई-वडील, आजी-आजोबा यांपासून सुरक्षित अंतरावर राहावे व त्यांच्याशी बोलताना घरांमध्ये सुद्धा मास्क वापरावे ज्यामुळे त्यांना होणारा कोरोणा प्रादुर्भाव टाळता येईल अशा सूचना तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.मनोज खोमणे यांनी केल्या आहेत.