
बारामतीकरांना लागली चिंता…
आणखी पंचवीस कोरोना अहवाल येणे बाकी….
बारामती:-प्रतिनिधी
आज सकाळी बारामतीमध्ये तब्बल नऊ व्यक्तींचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून एकाच वेळी नऊ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शहरात सर्वत्र चिंताजनक वातावरण आहे.
अजूनही २५ रुग्णांचे अहवाल येणे असल्याने त्यांचा अहवाल नेमका काय येतोय याच्या प्रतीक्षेत प्रशासन व बारामतीकर नागरिक आहेत.प्रशासनाने एकाच दिवसात अचानक कोरोनाचे नऊ रुग्ण सापडल्याने कठोर उपाययोजना करने गरजेचे असल्याचे नागरिकांकडून याबाबतची मागणी होऊ लागली आहे.
बारामती मध्ये दि. ११ रोजी करोना बाधित रुग्णांचा आकडा ४० वर होता. त्यामध्ये नऊ रुग्णांची भर पडल्याने हा आकडा आज ४९ वर पोहचला आहे. आता येणाऱ्या २५ जणांचा अहवाल काय येतो. यावर पुढील निर्णय अवलंबून आहे. बारामतीत अनेक नागरिक मास्क न लावताच फिरत असल्याचे निदर्शनास येत असून चिंतेची बाब आहे.
शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन न केल्याने व मुंबई पुणे सारख्या हॉटस्पॉट ठिकाहून प्रवास करणाऱ्या नागरिकांमुळे दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे.