बारामतीकरांसाठी काहीशी दिलासादायक बातमी.
३१ जणांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह.
बारामती वार्तापत्र
बारामती मध्ये काल घेण्यात आलेल्या एकूण ४५ जणांच्या कोरोनाच्या चाचण्यापैकी तब्बल ३१ जणांची कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आली असून १४ जणांचा अहवाल प्रतीक्षेत आहे असे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.खोमणे यांनी सांगितले.
दररोजची वाढणारी संख्या बघता आज तब्बल ३१ जणांचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याने काही प्रमाणात बारामतीकरांसाठी दिलासादायक वृत्त आहे.
शहरातील नागरिकांनी गर्दी न करता शासनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन वेळोवेळी स्थानिक प्रशासन करत असून लोकांनी ही आपली जबाबदारी ओळखून नियमांचे तंतोतंत पालन करण्याची गरज आहे.