बारामतीचा लॉकडाऊन कसा असणार .
बारामतीच्या लॉक डाऊनबाबत माननीय जिल्हाधिकारी काय म्हणाले त्याचा हा व्हिडिओ पहा.
बारामतीतील करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी बारामती शहर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. पुढील काही दिवस बारामती शहर बंद राहणार आहे. या बंदमध्ये नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे, आव्हान जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले त्याचा हा व्हिडिओ.
आज बारामतीत करोना आढावा बैठक घेण्यात आली. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी शहरात वाढणाऱ्या रुग्णांची संख्या कमी करण्याबरोबरच संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने बारामती शहर प्रतिबंधित क्षेत्र घोषित करून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहेत. मात्र एमआयडीसीतील उद्योग चालू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पुढे ते म्हणाले की, करोना आजारासंबंधी याआधीच बारामतीत चांगले काम करण्यात आले आहे. त्यामुळे अधिक काळजी करण्याची गरज नाही. करोना रुग्णांसाठी शहरात एक हजार सी.सी.सी. बेडची व्यवस्था आहे. शिवाय शहरातील चार खाजगी रुग्णालये कोरोनाच्या रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. असेही त्यांनी सांगितले. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बारामती शहर पुढील काही दिवस अल्पावधीतसाठी बंद राहणार आहे. या बंदला नागरिकांनी सहकार्य करण्याचे आव्हान करण्यात आले आहे.