बारामतीचा सिंघम ,पहा कोणाचे नाव आहे चर्चेत
‘आली रे आली ,आता तुझी बारी आली ‘
बारामती वार्तापत्र
तुम्ही सिंघम चित्रपट पाहिला असेलच आणि त्यातील डायलॉग ‘आली रे आली ,आता तुझी बारी आली ‘ ऐकला असेल मात्र हे काल्पनिक दृश्य तुम्हांला जर सत्यात पाहायचे असेल तर ठिकाण बारामती शहर पोलीस स्टेशन तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये प्रवेश करताच तुम्हाला ‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रीद वाक्य दिसते तुम्ही आजवर अनेक पोलीस स्टेशनची कोणत्या ना कोणत्या कारणाने पायरी चढला असाल मात्र पोलीस स्टेशनच्या आवारात गेल्यावर सामान्य माणसाला धडकी भरते आत मध्ये नक्की काय होणार याविषयीच्या धास्तीने हृदयाचे ठोके वाढू लागतात मात्र बारामती शहर पोलीस स्टेशनमध्ये तुम्ही गेल्यावर पोलीस निरीक्षकांच्या केबिनमध्ये खुर्ची च्या पाठीमागे लावलेली पाटी तुम्हाला दिसेल ‘ येथे लाच स्वीकारली जात नाही ‘ सामान्य माणूस ठाणे अंमलदार आहे तिथे गेल्यावर शोषितांना कोणत्याही प्रकारची दमदाटी न करता त्याची तक्रार ,अडचण, प्रश्न समजून घेतला जातो ही किमया आहे बारामती शहर पोलीस स्टेशनचे नव्याने रुजू झालेले बारामतीचे सिंघम पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांची
कामासाठी पैसे घेऊ नका
नामदेव शिंदे यांनी आपले कामकाज सुरू करतानाच सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना विश्वासात घेत कोणत्याही नागरिकाकडून आपण पैसे घेऊ नयेत,आपण जनतेचे सेवक असून आपण जनतेची कामे करावीत असे आवाहन त्यांनी पोलिस बांधवांना केले आणि त्या पद्धतीने कार्यवाही सुरू झाली.
अवैध धंदेवाल्यांना बसली जरब
नामदेव शिंदे यांनी सूत्रे हातात घेतल्यानंतर अनेक ठिकाणी सुशिक्षित बेरोजगार मुले आहेत ज्यांना आपल्या परिस्थितीमुळे शिक्षण घेताना अडचणी येत आहे त्यांना एमपीएससी, यूपीएससी च्या परीक्षा देण्याचे पाठबळ देण्यासाठी शहरातील अनेक भागात बैठका घेऊन त्यामध्ये होतकरू मुलांना स्पर्धा परीक्षेचे तयारी करावी याविषयी मार्गदर्शन केले यावेळी जमलेल्या काही नागरिकांनी अवैध धंद्या विषयी नामदेव शिंदे यांना सांगितले त्यावर हद्दीमध्ये ज्या ठिकाणी अवैध धंदे सुरू आहे तेथील नागरिकांना विश्वासात घेऊन व अवैध धंदेवाल्यांना यापुढे अशी कृत्य चालणार नाहीत असा सज्जड दम भरल्यामुळे अनेक अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले असून यापुढे कोणत्याही प्रकारचे अवैधंदे हद्दीत खपवून घेतले जाणार नाही असे ठणकावून सांगितले.
अतिक्रमणावर होणार कारवाई नगरपरिषदेचा अतिक्रमण विभाग यांच्या सहकार्याने बारामतीत अतिक्रमणामुळे होणारी वाहतूक कोंडी यावरही विशेष लक्ष देणार असल्याचे समजते त्यामुळे बारामती येथील रस्ते आता मोकळा श्वास घेणार हे नक्की
शहर पोलीस स्टेशनच्या आवारात गुन्ह्यातील मुद्देमाल, चोरीची वाहने, अपघातग्रस्त वाहने यांचा खच पडलेला होता तिथेही शिंदे यांनी लक्ष देऊन स्वच्छता व नीटनेटकेपणा करून सर्व वाहने व्यवस्थित रित्या ठेवले.
शहर भयमुक्त
बारामती शहरात खासगी सावकारी करणा-यांवर कारवाई झाली त्यामुळे सामान्य माणसाच्या मनात पोलिसांविषयी आदरभाव निर्माण झाला आहे व गुंडगिरी करणाऱ्या गुन्हेगारांना चांगलीच धडकी भरली आहे पीआय शिंदे यांनी दिवाळीच्या लक्ष्मीपूजनदिवशी होणाऱ्या चोऱ्याना प्रतिबंध घालण्यासाठी एक माहितीपत्रक काढुन लक्ष्मीपूजन या दिवशी नागरिकांनी घ्यावयाची काळजी याविषयी माहितीपत्रक वाटली त्यामुळे शहराची वाटचाल भयमुक्त वातावरणा कडे चालू असल्याचे सामान्य माणसांमध्ये बोलले जात आहे नागरिकांबरोबरच पोलीस दलातही परस्पर सहकार्य सामंजस्याचे वातावरण असून अशाच अधिकाऱ्याची बारामतीला गरज होती पोलिस कर्मचारीही पीआय नामदेव शिंदे यांचे खासगीत कौतुक करत आहेत