बारामतीची कोरोनाची परिस्थिती पाहता शरद पवारांची बारामती करांसाठी अनोखी भेट.
बारामतीची कोरोनाची परिस्थिती पाहता शरद पवारांची बारामती करांसाठी अनोखी भेट.
आवश्यकता असणाऱ्या रुग्णांसाठी इंजेक्शनचा वापर करण्याच्या केल्या सूचना.
बारामती:-प्रतिनिधी
बारामतीमध्ये दिवसेंदिवस वाढत असलेल्या कोरोना ची संख्या लक्षात घेता जेष्ठ नेते शरद पवारांनी रुग्णांसाठी उपयुक्त असणारी रेमीडेसेव्हर ची १०० इंजेक्शन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.संजयकुमार तांबे यांच्याकडे सुपूर्द केली.
बारामतीकरांच्या दृष्टीने ही इंजेक्शन्स उपयुक्त असून, ज्या रुग्णांना याची आवश्यकता असेल, अशांसाठी या इंजेक्शन्सचा वापर करण्याची सूचना शरद पवार यांनी तांबे यांना केली. या प्रसंगी बारामतीच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, गटनेते सचिन सातव, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर उपस्थित होते.
दरम्यान, शरद पवार यांनी बारामतीतील कोरोनाच्या परिस्थितीची डॉ. तांबे यांच्यासह पदाधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. कोरोनाची स्थिती आटोक्यात राहिल, या साठी आवश्यक ती उपाययोजना करण्याच्या सूचनाही पवार यांनी या प्रसंगी दिल्या.