स्थानिक
बारामतीचे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांच्या गाडीला अपघात
समोरील गाडीने अचानक ब्रेक मारल्यामुळे
बारामतीचे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांच्या गाडीला अपघात
समोरील गाडीने अचानक ब्रेक मारल्यामुळे
प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निकटवर्तीय किरण गुजर यांच्या इनोवा या गाडीस मंगळवारी आज दुपारी सासवड जेजुरी या रस्त्यावर अपघात झाला. सुदैवाने या अपघातात किरण गुजर यांना कोणतीही दुखापत झाली नाही.
शाळेतील विद्यार्थी रस्त्यावर आल्यानंतर समोरील गाडीने अचानक ब्रेक मारल्यामुळे त्यांच्या गाडीने समोरील गाडीला पाठीमागून धडक दिल्यामुळे हा अपघात झाला. या अपघातांमध्ये त्यांच्या गाडीच्या एअरबॅग खुल्या झाल्या , त्यामुळे त्यांना दुखापत झाली नाही. गाडीचा वेग हा मर्यादित होता त्यामुळे देखील फारशी दुखापत झाली नाही. मात्र या अपघातांमध्ये ईनोवा गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.