बारामतीच्या अतिरिक्त पोलिस अधीक्षकपदी मिलिंद मोहिते.
जयंत मीना यांची कोल्हापूर येथे बदली.
बारामतीच्या अतिरिक्त पोलिस अधीक्षकपदी मिलिंद मोहिते.
जयंत मीना यांची कोल्हापूर येथे बदली.
बारामती:वार्ताहर
बारामती येथील अतिरिक्त पोलिस अधीक्षक जयंत मीना यांची कोल्हापूर येथील भारत राखीव बटालियनचे समादेशक म्हणून बदली झाली असून, बारामतीचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक म्हणून मिलिंद मोहिते यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
अतिरिक्त पोलिस महासंचालक कुलवंत सारंगल यांनी या बदलीचा आदेश दिला आहे. तातडीने बदलीच्या ठिकाणी हजर होण्याचे आदेश संबंधितांना देण्यात आले आहेत.
मिलिंद मोहिते यांनी बारामतीत प्रशिक्षणार्थी उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून काम केले असून, भोर उपविभागीय अधिकारी व राज्य महामार्ग विभागाचे पोलिस अधीक्षक, सोलापूरचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक, स्वारगेटचे पोलिस उपायुक्त म्हणूनही त्यांनी काम केलेले आहे.
जयंत मीना यांनी आपल्या कारकिर्दीत अवैध व्यावसायिकांचे कंबरडे मोडले. त्यांच्या काळात सर्वाधिक कारवाया पोलिसांनी केल्या. बारामती क्राईम ब्रँच पथकाची नियुक्ती करुन धडाकेबाज कारवाई हे त्यांच्या कारकिर्दीचे वैशिष्टय ठरले होते