उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर ही नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या पदरी निराशा
उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतरही हाती काहीच नाही
बारामतीच्या कोरोना योद्ध्यांचे आंदोलन अखेर मागे
उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतरही हाती काहीच नाही
बारामती वार्तापत्र
बारामती नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचे मागील दोन दिवसापासून सानुग्रह अनुदाना साठी सुरू असलेले आंदोलन अखेर आज उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या बैठकीनंतरही काहीच हाती न लागल्यामुळे समाप्त झाले. मागील दोन दिवसापासून नगरपालिकेचे 300 कर्मचाऱ्यांनी सानुग्रह अनुदाना साठी नगरपरिषद समोर काळ्या फिती लावून आंदोलन केले व त्यानंतर कामबंद आंदोलन छेडण्यात आले होते कोरोनाच्या महामारीच्या आठ महिन्याच्या कालावधीत नगरपरिषदेचे सर्व कर्मचाऱ्यांनी आपले तन मन धन अर्पण करून स्वतःच्या जीवाची व कुटुंबाची पर्वा न करता केलेल्या कार्याची पैशामध्ये तुलना होऊच शकत नाही परंतु प्रत्येक व्यक्तीला आपण केलेल्या कार्याची काहीतरी पावती मिळावी म्हणून या कामगारांनी दरवर्षी मिळणारे वीस हजार रुपये अनुदान त्यामध्ये थोडीशी वाढ करून पंचवीस हजार रुपये अनुदान देण्यात यावे अशी मागणी केली होती सुरुवातीला नगराध्यक्षांनी यासाठी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करू असे आश्वासन दिले होते मात्र ऐनवेळी त्या भूमिकेवरून आर्थिक अडचणीतून मार्ग काढुन निर्णय घेऊ असे सांगितल्यामुळे या आंदोलनाला सुरुवात झाली होती.
नगराध्यक्षांनी घेतली आंदोलकांची भेट
सानुग्रह अनुदानाच्या मुद्यावरून पुकारलेल्या आंदोलकांची आज उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या बैठकीनंतर नगराध्यक्षा सौ पौर्णिमाताई तावरे यांनी कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांनी कर्मचाऱ्यांना विनंती केली की आपण उद्यापासून कामाला लागावे आचारसंहिता असल्यामुळे काही गोष्टींचे निर्बंध नगरपालिकेवर आहेत, आपले हे एकत्र कुटुंब आहे आपण ज्या पद्धतीने कोवीडच्या काळात सहकार्य केले त्याप्रमाणे आपण यावेळेसही सहकार्य करावे पुढच्या वर्षी आपल्याला निश्चित प्रकारे न्याय देण्यात येईल असे आवाहन त्यांनी कर्मचाऱ्यांना केले व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आंदोलन मागे घेत असल्याचे जाहीर केले
नगरपालिकेवर चढून आंदोलकांनी काळे झेंडे फडकले
सानुग्रह अनुदानाचे हे आंदोलन पहिल्यापासूनच खरे तर चर्चेचा विषय बनले होते परंतु कर्मचाऱ्यांना कोणीही दाद देत नसल्यामुळे आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब हे बारामतीत असताना तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे बारामतीत असताना बारामतीतीलच नगरपालिकेचे कर्मचाऱ्यांनी ऐन दिवाळीत नगरपालिकेच्या आजपर्यंतच्या इतिहासात कधीही इतके टोकाचे आंदोलन झाले नव्हते ते आंदोलन आज शहरवासीयांना पाहायला मिळाले त्यामुळे नगरपालिकेच्या कारभाराविषयी नागरिक खंत व्यक्त करत होते.
शेजारच्या नगरपालिकांनी दिले सानुग्रह अनुदान.
बारामतीच्या शेजारील दौंड, इंदापूर, जेजुरी, सासवड ,पुरंदर या नगरपालिकांनी आपल्या कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदानाची भेट दिवाळीपूर्वी दिली आहे मात्र राज्यात नावाजलेली आणि 711 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प असणारी नगरपालिका या कामगारांना सानुग्रह अनुदान देण्यास हात आखडता घेत आहे
कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली भीती
या आंदोलनामध्ये कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने भाग घेतला होता त्याचा परिणाम म्हणून आम्हाला असुरक्षित वातावरण निर्माण होऊ नये आमच्यावर अन्याय होऊ नये किंवा कोणीही या आंदोलनाचा राग घेऊन वेगळ्या पद्धतीने कारवाई करू नये अशी शक्यता काही कामगारांनी व्यक्त केली मात्र नगराध्यक्षांनी सांगितले की असे काही होणार नाही सर्वजन तुमच्या पाठीशी आहेत
बारामती वार्तापत्र ने मांडले वास्तव
नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांचे सानुग्रह अनुदानाचे आंदोलन हे बारामतीला साजेसे नसल्याचे व ऐन दिवाळीत कर्मचाऱ्यांना, त्यांच्या कुटुंबांना दिवाळी पासून वंचित ठेवणारे हे आंदोलन असल्याने तसेच कोरोनाचा जागतिक सामाजिक प्रश्न म्हणून कर्मचाऱ्यांनी या कामाकडे पाहिले मग फक्त नावालाच कोरोना योद्धे म्हणून त्यांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न तर होत नाही ना याचासुद्धा विचार वेळोवेळी बारामती वार्तापत्र ने व्यक्त केला होता व वस्तुस्थितीचा मागोवा घेत विषयाचे गांभीर्य पाहून कामगारांच्या बाजूने आवाज उठवला होता. त्यामुळे शहरातील नागरिकही आमच्या पाठीशी आहेत याची जाणीव आम्हाला आज झाली असे आंदोलकांनी जाहीररीत्या सांगितले.